तंबीमुळे वसुलीला गती..!

Accelerates recovery due to cough ..!
Accelerates recovery due to cough ..!

नगर ः महापालिकेचा 228 कोटी 14 लाख रुपयांचा मालमत्ताकर वर्षानुवर्षे थकीत आहे. त्यातच महापालिका कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगातील फरक, उर्वरित सानुग्रह अनुदान, हरित लवादाकडे पाच कोटींची अनामत रक्‍कम देणे आदी मोठी देणी बाकी आहेत. त्यामुळे थकीत कर वसुली वेगात होणे आवश्‍यक आहे. 

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे महापालिकेचा कारभार येताच त्यांनी वसुलीची धडाकेबाज मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणेच पूर्णवेळ सक्षम आयएएस अधिकारी नगरमध्ये आयुक्‍त असावेत, अशी मागणी त्यामुळे जोर धरू लागली आहे. 

सेवानिवृत्ती जवळ आलेले आयुक्‍त नेमले जातात. त्यांच्याकडून शहरात ठोस अशी कामेच होत नाहीत. त्यातही तिसऱ्यांदा पदभार आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांमुळेच शहरात मालमत्ताकर वसुली वाढते, असा अनुभव नगरकरांना आला आहे. महापालिकेचे आयुक्‍त दबावाखाली काम करतात, असा आरोपही वेळोवेळी होतो. 

महापालिकेचा प्रभारी पदभार तिसऱ्यांदा मिळताच द्विवेदी यांनी मंगळवारी वसुली विभागाची बैठक घेतली. यात वसुलीचे 50 कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. महापालिकेचा मंगळवारी सकाळपर्यंत 228 कोटी 14 लाख रुपये थकीत मालमत्ताकर आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात 36 कोटी 57 लाख रुपयांची वसुली झाली आहे. काल महापालिकेने 10 लाख रुपयांची वसुली केली. द्विवेदी यांनी महापालिकेच्या चारही प्रभाग समित्यांना वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार प्रभाग समिती एकसाठी 13 कोटी, प्रभाग समिती दोनसाठी 15 कोटी, प्रभाग समिती तीन व चारसाठी प्रत्येकी 10 कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. 

शहरात एक लाख 15 हजार मालमत्ताधारक आहेत. यातील पाच लाख रुपयांपेक्षाही जास्त थकीत असलेले 268 मालमत्ताधारक आहेत. त्यांच्या मालमत्तांची जप्तीची प्रक्रिया महापालिकेने युद्धपातळीवर सुरू केली आहे. 

जप्त झालेल्या मालमत्तांचा लिलाव करून महापालिका वसुली करणार आहे. त्यासाठी महापालिकेची मान्यता यापूर्वीच घेण्यात आलेली आहे. महापालिका प्रशासनाने हे उद्दिष्ट जरी पूर्ण केले, तरी प्रत्येक महिन्याला दोन कोटी रुपयांप्रमाणे 44 महिन्यांत 88 कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगातील फरकाच्या रूपात द्यायचा आहे. 

मोठे मालमत्ताकर थकबाकीदार 

प्रभाग समिती क्रमांक 1 - 50 
प्रभाग समिती क्रमांक 2 - 69 
प्रभाग समिती क्रमांक 3 - 49 
प्रभाग समिती क्रमांक 4 - 100 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com