कोल्हापूर : मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातामध्ये तरूण ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

अजिम याने नवी मोटार सायकल घेतली होती. म्हणून ते दोघे मोटार सायकलवरून फिरण्यासाठी गेले होते. डोणोली येथील चरण फाट्यावर मोटर सायकल घसरल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. यात सागर व अजिम हे दोघेही गंभीर जखमी झाले.

बांबवडे ( कोल्हापूर ) - शाहुवाडी तालुक्यातील डोणोली येथे मोटर सायकल घसरून अपघात झाला. यामध्ये एक तरूण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. सागर संजय कुंभार (वय २६, रा. डोणोली) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अजिम जहाँगीर अत्तार (वय १९, रा. बांबवडे ) असे गंभीर जखमीचे नाव आहे. 

याबाबत माहिती अशी की, सागर कुंभार हा एका खासगी शाळेत शिक्षक आहे. तो अजिम या त्याच्या मित्रासोबत मोटारसायकलवरून जात होता. अजिम याने नवी मोटार सायकल घेतली होती. म्हणून ते दोघे मोटार सायकलवरून फिरण्यासाठी गेले होते. डोणोली येथील चरण फाट्यावर मोटर सायकल घसरल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. यात सागर व अजिम हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान सागर याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पोलिसात करण्याचे काम सुरू आहे. 

वाचा आणखी बातम्या -

धक्कादायक ! बलुन गॅस सिलिंडरच्या स्फोटात मुलगी ठार 

केंद्राच्या नव्या नियमामुळे या कंपनीत  मेगा व्हीआरएस 

‘थिंक पॉईंट’ नाटकात घेतलाय या प्रश्नांचा वेध 

स्वाभिमानी संघटनेने साखर कारखानदारांना दिला हा इशारा 

सांगली पालिका आयुक्तांनी का रोखले गटारीचे काम ? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident Near Donoli In Shahuwadi Taluka One Dead