वाहन उलटल्याने माण तालुक्यात दाेघे ठार; चार जखमी

वाहन उलटल्याने माण तालुक्यात दाेघे ठार; चार जखमी
Updated on: 

म्हसवड : सातारा-लातूर रसत्यावर पिंपरी (ता.माण) नजिक चारचाकी वाहन पलटी होवून झालेल्या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार झाले आहेत. या अपघातामध्ये चौघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी (ता.29) रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.

या अपघातात ठार झालेल्या मृतांची नावे अलका शेडगे (राहणार बचेरी ता.माळशिरस) आणि गंगाराम ढवळे (राहणार धुळदेव ता.माण) अशी आहेत.
या अपघातात आबा बरकडे, गुलाब लडके, तातोरंग राजगे, रुक्मिणी शिंदे (सर्व राहणार बचेरी, ता.माळशिरस जि. सोलापूर) जखमी झाले आहेत. या प्रकरणी प्रकाश शरद काकडे (राहणार बचेरी) यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या संबंधित अपघातग्रस्त (एमएच ४५ एएफ-०१८५) वाहनाचे चालक पप्पू किसान बिडे (राहणार.बचेरी) याचेवर भरधाव वेगाने वाहन चालविणे बाबत गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. 

हेही वाचा : ब्रेकिंग : सातारकरांना टाेलमाफ हाेणार ? पालकमंत्र्यांचा पुढाकार

जरुर वाचा : बारावीची प्रश्‍नपत्रिका जेव्हां मोबाईलवरून वर्गाबाहेर जाते...

नक्की वाचा : ...म्हणून त्यावेळी फडणवीस सरकारला घाम फुटला : पृथ्वीराज चव्हाण

अवश्य वाचा : सातारकरांनाे सावधान! जे शनिवारात घडलं ते तुमच्या बराेबरही घडेल



जुगार अड्ड्यावरील छाप्यात जायगावात दहा जणांवर गुन्हा 

औंध (जि. सातारा) : जायगाव (ता. खटाव) येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून औंध पोलिसांनी एक लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करून दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
 
पोलिस ठाण्यामधून मिळालेली अधिक माहिती अशी, शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास जायगाव गावच्या हद्दीत तळी नावचे शिवारात करंजाचे झाडाखाली तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता त्याठिकाणी दहा जण तीन पानी जुगार खेळत असल्याचे पोलिसांना आढळून आले. यामध्ये प्रकाश पवार, बाळू माने, विठ्ठल गुरव, सुरेश शिंदे, जालिंदर राऊत, सुभाष देशमुख, मारुती शिंदे, संतोष पवार (रा. सर्व जायगाव) या आठ जणांना मुद्दे मालासह पोलिसांनी जागीच पकडले. पोपट माने व विशाल माने (रा. जायगाव) हे दोघे त्याठिकाणाहून पळून गेले.
 
पोलिसांनी रोख रक्कम तीन हजार 450 सह तीन मोबाईल, चार मोटरसायकली जप्त केल्या. यामध्ये एकूण एक लाख वीस हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
घटनेची नोंद औंध पोलिस ठाण्यामध्ये झाली आहे. याकामी पोलिस उपनिरीक्षक गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक प्रशांत पाटील, पंकज भुजबळ, कुंडलिक कटरे, सुभाष डुबल, बी. एन. जाधव यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam additional water demand for Sangli
Sangli District Bank Election Strategy
Woman Allegedly Extorted of ₹17 Lakh
Gopichand Padalkar sangli jilha bank
Marathi News Esakal
www.esakal.com