सातारकरांनाे सावधान! जे 'शनिवारा'त घडलं ते तुमच्या बराेबरही घडेल

सातारकरांनाे सावधान! जे 'शनिवारा'त घडलं ते तुमच्या बराेबरही घडेल

सातारा : पाणी पिण्याचा बहाणा करून घरात येऊन गप्पाच्या ओघात तुमच्या मुलाचे लग्न जुळवून देतो, असे सांगून शनिवार पेठेतून एका घरातील 44 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
 
याबाबत राहुल अशोक थिटे (वय 41, रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (ता. 21) ते कामासाठी गेले होते. त्या वेळी आई-वडील दोघेच घरी होते. त्या वेळी एक अनोळखी व्यक्ती घरात आला. त्याने नितीन शिंदे येथे कुठे राहतात, अशी विचारणा केली. त्या वेळी ते आमच्या घराच्या मागे राहायला असल्याचे आईने त्यांना सांगितले, तसेच त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी दिल्यानंतर त्यांने घरात कोण कोण राहते, याची चौकशी केली. आईने कुटुंबाची माहिती देण्याबरोबरच सुनेचे सात वर्षांपूर्वी निधन झाल्याची माहितीही त्याला दिली. त्यानंतर त्याने तुमच्या मुलाच्या विवाहाचे मी पाहतो, तुम्ही घरातील एक नारळ, गहू, तांदूळ, तीन सुपारी आणि तीन सोन्याचे दागिने द्या, असे सांगितले.

हेही वाचा : नाद नाय करायचा : कऱ्हाड पालिका अव्वल; सातारा पिछाडीवर

वाचा : चर्चाच चर्चा : विद्यार्थीनीशी लगट दाेन शिक्षकांच्या अंगलट

जरुर वाचा : ...म्हणून अतिक्रमण कारवाईत हवालदाराने लावली जीवाची बाजी

त्याच्या सांगण्यानुसार आईने सोन्याची दोन मंगळसूत्र व कानातील फुले त्याला दिले. यानंतर त्याने सर्व साहित्य व सोने एका कागदावर कापड अंथरुण त्यावर ठेवले. मी हे दागिने बांधून एका डब्यात ठेवतो, तो डबा माळ्यावर ठेवतो. तोवर तुम्ही सर्व जण पाया पडा व सात दिवसांनी डबा उघडा, असे सांगितले. ते पाया पडून आले तोपर्यंत तो व्यक्ती घरातून निघून गेला होता. शंका आल्याने अर्ध्या तासाने त्यांनी दागिन्यांचा डबा उघडून पाहिला. त्या वेळी त्यात दागिने नव्हते. अशाप्रकारे फसवणूक झाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

वाचा सविस्तर : उदयन महाराजांच्या कार्यक्रमाचा अडीच लाख रुपये खर्च अन् तुमच्या... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com