esakal | नगर जिल्हा बँकेने दिली कर्जफेडीला मुदतवाढ, मार्चएण्ड झाला जूनएण्ड
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar District Bank extends loan extension

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 27 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार अल्प मुदत, मध्यम मुदत, दीर्घ मुदत इत्यादी कर्जाच्या वसुलीस पात्र (परतफेड)  30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ दिली.

नगर जिल्हा बँकेने दिली कर्जफेडीला मुदतवाढ, मार्चएण्ड झाला जूनएण्ड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्ज तसेच मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना भारतीय रिझर्व बँकेने तर फेडीसाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. बँकेने 31/ 3/ 2020 अखेर वसूल पात्र असलेल्या सर्व कर्जाची परतफेड येत्या 30 जूनपर्यंत करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी दिली.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने कर्ज वाटप केलेल्या कर्जाचा वसूल पात्र कर्जाचा भरणा दिनांक 31/3/2020 रोजी करण्यासाठी काही शाखांमध्ये कर्जदारांनी गर्दी केलेली होती. सध्याच्या कोरोना संसर्गजन्य रोगामुळे शासनाने सर्वत्र 144 कलम लागू केल्याने व कर्जफेडीस मुदती वाढीचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आदेश नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये व शासनाच्या 144 कलमाचे आदेशाने शाखांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून बँकेने 28 व 29 मार्च रोजी शाखा सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. तथापि रिझर्व बँक ऑफ इंडियाचे आदेश दिनांक 27 /3 /2020 रोजी बँकेस उशिरा प्राप्त झाल्याने बँकेने आज तात्काळ  28 रोजी सुधारित परिपत्रकाद्वारे सर्व शाखांना व प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना सुचना देण्यात आल्याची माहिती अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी दिली. 

हेही वाचा - नगरमध्ये पुन्हा भरला येड्यांचा बाजार

ते पुढे म्हणाले, संपूर्ण देशभरात 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉक डाऊन करण्यात आलेले आहे. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी राज्यात करण्यात आलेल्या विविध योजनांमध्ये आर्थिक व्यवहार सुरू ठेवण्यात अडचणी येत आहेत. भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 27 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार अल्प मुदत, मध्यम मुदत, दीर्घ मुदत इत्यादी कर्जाच्या वसुलीस पात्र (परतफेड)  30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती दिली.

बँकेच्या नियोजित धोरणानुसार या परतफेडीची मुदत दरवर्षी 31 मार्च असते. या निर्णयाचा अहमदनगर जिल्ह्यातील बँकेच्या संलग्न प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सोसायट्या शेतकरी कर्जदार सभासदांना फायदा होणार आहे. जिल्हा बँकेने खरीप पिकासाठी सुमारे 711 कोटींचे तर रब्बी पिकांसाठी सुमारे 82 कोटीचे कर्जवाटप केले असल्याची माहिती अध्यक्ष गायकर यांनी दिली.