कऱ्हाड ः शहरातील ज्या बड्यांची अतिक्रमणे पालिकेने काढलेली नाहीत. त्याची माहिती घेऊन न्यायालयात दाद मागू. त्याशिवाय ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेत लक्ष घालू नये. मात्र, त्याच वेळी पालिकेने सरसकट अतिक्रमणे हटवावीत, अशी भूमिका येथील सामाजिक कार्यकर्ते गोरख शिंदे यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
पालिका व पोलिस प्रशासनाची अतिक्रमण हटाव मोहीम योग्य आहे, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले, ""शहरातील अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. पालिकेने सरसकट कारवाई करावी. शहरातील काही बड्या लोकांची अतिक्रमणे पालिकेने काढलेली नाहीत, अशा तक्रारी आहेत. त्याची माहिती घेऊन न्यायालयात दाद मागणार आहे.
शहरातील रस्ते, फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. शहरातील रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडी होत होती. पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवत शहरातील रस्ते मोकळे केल्याने ते मोठे झाले आहेत. ज्येष्ठ नगरसेवक पावसकर यांनी मोहिमेवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी मोहिमेत हस्तक्षेप करू नये. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी काम न केल्यामुळेच शहराची दुरवस्था झाली आहे. नगरसेवकांना कारवाई चुकीची वाटत होती, तर कारवाई सुरू असताना एकही नगरसेवक रस्त्यावर का आला नाही. शहरातून लोकांना चालणेही अवघड झाले असताना नगरसेवकांनी आतापर्यंत अतिक्रमणे का हटवली नाहीत, याचा विचार करावा. शहरातील हॉकर्स झोनचा प्रश्न मिटवावा.''
अवश्य वाचा : ..म्हणून अतिक्रमण कारवाईत हवालदाराने लावली जीवाची बाजी
वाचा : हिरो व्हायच्या नादात सिओने केले कऱ्हा़डचे वाटोळे
हेही वाचा : सह्याद्री व्याघ्रत हाेतेय या प्राण्यांचेही दर्शन
जरुर वाचा : शाब्बास : अक्षता पडण्यापुर्वी पाेलिसांनी राेखला विवाह
वाचा : नाद नाय करायचा : कऱ्हाड पालिका अव्वल; सातारा पिछाडीवर
सातारा सातारा सातारा सातारा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.