अखेर मृत्यूच्या दाढेतून भारतीय परतणार

अखेर मृत्यूच्या दाढेतून भारतीय परतणार

सातारा : सर्व जगाला हादरुन टाकणारा कोरोना व्हायरस जेथे आहे त्या चीनमधील वुहानमध्ये दहा फेब्रुवारीपासून मी देशवासियांना मदतीची हाक देत होते. सोशल मिडियाच्या माध्यामातून साद घालत होती. या माझ्या हाकेला उत्तम प्रतिसाद मिळाला. मी आणि देशवासीय लवकरच मायदेशात परतणार आहे. कोरोना साथ सुरु झाल्यापासून चीनमध्ये अडकलेल्या मी व माझ्यासह सुमारे 90 देशवासियांना जे धैर्य दिले ते आम्ही आयुष्यभर विसरु शकणार नाही. आम्ही लवकरच परतू असा संदेश आज (बुधवार) वुहानमधील मराठमोळ्या अश्‍विनी पाटील हिने ट्विट केले आहे. दरम्यान मंगळवारी (ता.25) आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही देशातील 90 नागरीक चीनमधून लवकरच परतणार असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली हाेती.
वाचा : Coronavirus : धैर्यवान अश्विनी पाटीलचा थरारक अनुभव

काेराेना व्हायरसमुळे चीनमधील भारतीय नागरीकांना परतण्यास विलंब लागत होता. त्यातच काही नागरीकांना तांत्रिक अडचणींमुळे मायदेशात परतता येत नव्हते. यामध्ये साताऱ्यातील अश्‍विनी पाटील हिचा समावेश आहे. तिने पासपोर्ट दूतावास कार्यालयात जमा केल्याने यापुर्वी भारतातून आलेल्या विमानातून प्रवास करता येणे शक्‍य नव्हते. त्यातच तिचे पती आजारी असल्याने तिने वुहानमध्येच थांबणे पसंत केले. काही दिवसांनंतर पूढील उपचारार्थ तिचे पती पोलंडला रवाना झाली. एकीकडे कोरोनाची भयवाह परिस्थिती आणि दूसरीकडे मायदेशी परतण्याची उत्कंठा होती. परंतु त्यातून मार्ग निघत नव्हता. अखेरीस अश्‍विनीने दहा फेब्रुवारीस सकाळच्या प्रहरी एका व्हिडिओच्या माध्यमातून भारत सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर एका वृत्त वाहिनीस दिलेल्या मुलाखतीत तिने चीन आणि भारत सरकार कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात कोठेही कमतरता जाणवत नसल्याचे स्पष्ट केले होते. साधारणतः 25 मिनीटांच्या मुलाखतीत तिने वूहानमधील भयवाह परिस्थितीचे कथन केले परंतु त्यातूनही आम्ही सुरक्षित असल्याची खात्री दिली होती.

हेही वाचा : Video : आश्विनी बाळा, काळजी करु नकाेस देश तुझ्या पाठीशी आहे

तिने मदतीची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी वुहानमधील भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यामध्ये आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, माजी खासदार उदयनराजे भोसले हे सातत्याने प्रशासनाशी संपर्कात राहिले. तसेच आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय स्तरावर तसेच वुहानमधील दूतावास कार्यालयात सातत्याने पाठपूरावा करुन भारतीयांना पाठबळ देत राहिले.आज वुहानमधून आम्ही लवकरच देशात येणार असल्याचे नमूद केले आहे.
Coronavirus : वुहानमधील अश्‍विनी पाटीलसह भारतीयांचा प्रवास लांबला
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com