धाडसच! आधी पत्नीला मारहाण; आता पोलिसांवर हल्ला

धाडसच! आधी पत्नीला मारहाण; आता पोलिसांवर हल्ला

सोलापूर : पोलिसांनी तडीपार केले असतानाही शहरात येऊन गोंधळ घालणाऱ्या नागराज गायकवाड याला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर त्याने कुऱ्हाडीने हल्ला केला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात दोन पोलिस बचावले असून यात सरकारी वाहनांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा : Solapur : नवी पेठेत सोमवारपासून वाहनांना बंदी! कारण​

पोलिसांवरच हल्ला चढवला
नागराज गायकवाड याला पोलिस उपायुक्त यांच्या आदेशान्वये सोलापुरातून तडीपार करण्यात आले आहे. त्याला तडीपार केल्यानंतर त्याने दवाखान्यात जाऊन पत्नीने दिलेल्या फिर्यादीमुळे तडीपार केल्याचा राग मनात धरून बेदम मारहाण केली होती. याबाबत सलगरवस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, बुधवारी सायंकाळी गायकवाड हा पुन्हा घरी येऊन पत्नीस मारहाण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिस शिपाई सचिन जावळे आणि त्यांचे सहकारी गेले होते. पोलिस पकडण्यासाठी आल्याचा राग आल्याने नागराज याने शिवीगाळ करत पोलिसांवरच हल्ला चढवला.

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नागराजकडून झालेला हल्ला जावळे यांनी चुकविला. मात्र, यात पोलिस वाहनाचे नुकसान झाले. नागराज याला ताब्यात घेऊन त्याच्यावर सलगरवस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक श्‍वेताली सुतार तपास करत आहेत. या गुन्ह्यात आरोपी नागराज यास अटक केली असून त्याची 17 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

हेही वाचा : मोबाईल ऍप बनविण्यासाठी किती खर्च येतो? वाचा..  

उपचार घेत असताना मारहाण 
आठ दिवसांपूर्वीच नागराज गायकवाड याने पत्नी सोनाली हिला दवाखान्यात उपचार घेत असताना मारहाण केली होती. त्यानंतर नागराज याने पुन्हा बुधवारी गरिबी हटाव झोपडपट्टी येथील सुशील मराठी शाळेजवळील घरी जाऊन पत्नी आणि सासूला कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी सासरा आणि त्याचा भाऊ पकडण्यास आल्यानंतर त्यांना देखील हातातील कोयत्याने डोक्‍यात मारून जखमी केले. याप्रकरणी सासू पद्मा राजू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नागराज गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com