esakal | बेळगाव : गणेशोत्सवात प्रवाशांच्या सुविधेसाठी अतिरिक्त 50 बसेस
sakal

बोलून बातमी शोधा

Belgaum Bus

बेळगाव : गणेशोत्सवात प्रवाशांच्या सुविधेसाठी अतिरिक्त 50 बसेस

sakal_logo
By
विनायक जाधव

बेळगाव : वायव्य परिवहन महामंडळाने गणेशोत्सवात प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी अतिरिक्त ५० बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. पण यंदा देखील महाराष्ट्र वगळता इतर मार्गावर या बसेस धावणार आहेत.

हेही वाचा: महापालिका स्थायी सभापतीसाठी 'काँग्रेस-भाजप'मध्ये जुंपणार

आर्थिक तोट्यात सापडलेल्या परिवहन मंडळाने गणेशोत्सवाची संधी कॅश करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यासह राज्यातील लांब पल्ल्याच्या मार्गावर अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यंदा गणेशोत्सव शुक्रवारी आला असून महिन्यातील दुसरा शनिवार आणि रविवार यामुळे सलग तीन दिवस शासकीय सुट्टी आहे. बेळगावात काम करणारे बहुतेक कर्मचारी हे दक्षिण कर्नाटकातील असून सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे अनेकजण सणासाठी घराकडे परतणार आहेत.

हेही वाचा: Kolhapur Rain - राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले

बेळगाव जिल्ह्यातील अनेकजण कामानिमित्त गोव्यात असतात. ते देखील सणासाठी घराकडे परतत असल्यामुळे बसेसना गर्दी होणार आहे. त्यासाठी दक्षिण कर्नाटकातील विविध जिल्ह्यांसह गोवासाठी अतिरिक्त बसेस सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लोक घराकडे परतू शकणार आहेत. उद्यापासून (ता. ९) सोमवार पर्यंत (ता. १३) ही अतिरिक्त बससेवा उपलब्ध असणार आहे. यासाठी ऑनलाईन बुकिंग सेवाही उपलब्ध करून देण्यात आली असून परिवहनच्या संकेतस्थळावर जाऊन प्रवासी आपली बसमधील जागा आरक्षित करू शकणार आहेत. यासह मध्यवर्ती बसस्थानकावर देखील बस आरक्षण केली जाऊ शकते.

हेही वाचा: सदाभाऊ खोत-राजू शेट्टी यांच्यातील संघर्ष वाढणार?

दरम्यान यंदा देखील महाराष्ट्रातील बेळगावकराना गणेशोत्सव त्याच ठिकाणी साजरा करावा लागणार आहे. कर्नाटक सरकारने अद्याप महाराष्ट्रातून येणाऱ्याना आरटीपीसीआर कोरोना चाचणी अहवाल सक्तीचा ठेवला आहे. आंतरराज्य सेवा जरी सुरू असली तरी या अहवालाच्या सक्तीमुळे कोणीही महाराष्ट्रतुन बेळगावात येण्यास तयार नाही. त्यामुळे परिववहनची सेवा सुरू असली तरी प्रवासी नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाने देखील या मार्गावर बसेस कमी सोडल्या आहेत. पण त्या देखील रिकाम्या धावत असल्याने सद्या गणेशोत्सवमध्ये कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य सेवेत अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. मागील वर्षी देखील गणेशोत्सवात या दोन्ही राज्यात प्रवास झाला नाही.

loading image
go to top