भाजपाचे उदयनराजेंना 'हे' असेल बर्थडे गिफ्ट

सिद्धार्थ लाटकर
Friday, 7 February 2020

माजी खासदार उदयनराजेंच्या राज्यसभेच्या खासदारकीच्या घाेषणा त्यांच्या वाढदिवसा दिवशी (ता. 24 फेब्रुवारी) केली जाणार आहे. ही घोषणा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिल्लीतूनच केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सातारा : माजी खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस येत्या 24 फेब्रुवारीला आहे. या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून भाजपकडून त्यांना राज्यसभेवर घेण्याची आणि मंत्रीपद देण्याची घोषणा होणार आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रही भूमिका घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याची खात्रीशिर माहिती उपलब्ध झाली आहे. 

सातारा लोकसभा पाेटनिवडणुकीतील पराभवाची भरपाई करताना उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेऊन त्यांना मंत्रीपद देण्याचा शब्द खुद्द केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी दिला आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या सात जागा रिक्त होणार आहेत. यातील एका जागेवर उदयनराजे भोसले यांची खासदार म्हणून वर्णी लावण्यात येणार आहे.

हेही वाचा -  राजेच म्हणतात शिवजयंती एकच असावी

दरम्यान उदयनराजेंच्या खासदारकीच्या घाेषणा त्यांच्या वाढदिवसा दिवशी (ता. 24 फेब्रुवारी) केली जाणार आहे. ही घोषणा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिल्लीतूनच केली जाणार आहे. उदयनराजेंचे पुनर्वसन व्हावे यासाठी दस्तुरखूद्द माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये उदयनराजे, फडणवीस आणि भाजपमधील वरिष्ठ स्तरावरील नेत्यांची बैठका झाल्या. या बैठकांमध्ये उदयनराजेंचा दिल्लीच्या मार्गाबाबत सकारात्मक चर्चा झाली. ही चर्चा माध्यमांतून आता राज्यभरात पाेहचली आहे. भाजपच्या गाेटातून उदयनराजेंच्या वाढदिवसा दिवशीच त्यांच्या राज्यसभेची खासदरकीची घाेषणा करण्याबाबत हालचालींना प्रारंभ झाला आहे. उदयनराजेंच्या वाढदिवसा दिवशीच भाजपकडून घोषणा झाल्यास त्यांचा उचित सन्मानच होईल अशी भावना सातारकरांमधून व्यक्त हाेत आहे.
 
हेही वाचा -  Video : उदयनराजे पुन्हा चर्चेत

हेही वाचा - यासाठी उदयनराजे समर्थक आग्रही 

हेही वाचा - डॅशिंग उदयनराजेंचं हळवं रुप!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP May Decleare Udayanraje Bhosale For Rajyasabha