विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू; भरपाई नाकारली; महापालिकेला दिलासा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

बेळगाव - गोवावेसमधील महापालिकेच्या जलतरण तलावात बुडून मरण पावलेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाला ग्राहक न्यायालयाने भरपाई नाकारली आहे. त्यामुळे, महापालिकेला दिलासा मिळाला आहे. 

हे पण वाचा - जन्म-मृत्यूदाखल्यासाठी पुन्हा टोकन 

बेळगाव - गोवावेसमधील महापालिकेच्या जलतरण तलावात बुडून मरण पावलेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाला ग्राहक न्यायालयाने भरपाई नाकारली आहे. त्यामुळे, महापालिकेला दिलासा मिळाला आहे. 

हे पण वाचा - जन्म-मृत्यूदाखल्यासाठी पुन्हा टोकन 

गोवावेस जलतरण तलावात 25 मार्च 2015 रोजी मदन बाबू शेट्टी या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला होता. दहावीचे शिक्षण पूर्ण करुन आयटीआय करणारा मदन तलावात पोहण्यासाठी गेला होता. तलाव महापालिकेच्या मालकीचा असला तरी त्याची देखभाल रोटरी क्‍लबकडून होते. त्यामुळे, या घटनेनंतर दोन वर्षांनी म्हणजे 2017 मध्ये मदनचे वडील बाबू शिवाप्पा शेट्टी यांनी भरपाईसाठी ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी या घटनेसाठी महापालिका व रोटरी क्‍लबला जबाबदार धरले होते. मदनच्या मृत्यूची भरपाई म्हणून त्यांनी 20 लाख रुपयांची मागणी केली होती. घटनेवेळी एम. आर. रविकुमार महापालिका आयुक्त होते. घटनेला महापालिका जबाबदार नसल्याचे त्यांनी त्यावेळीच स्पष्ट केले होते. भरपाईसाठी ग्राहक न्यायालयात याचिका दाखल झाली त्यावेळी शशीधर कुरेर आयुक्त होते. याचिका दाखल झाल्यानंतर महापालिकेला नोटीस पाठविली. त्यावर महापालिकेकडून युक्तिवाद करण्यात आला. गोवावेस जलतरण तलाव महापालिकेच्या मालकीचा असला तरी तो एका संस्थेला भाडेकराराने दिला आहे. त्यामुळे, तेथील घटनांशी महापालिकेचा थेट संबंध नाही असा युक्‍तिवाद महापालिकेने ग्राहक न्यायालयात केला होता. तो ग्राह्य धरुन न्यायालयाने या घटनेला महापालिका जबाबदार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

हे पण वाचा - सावधान ; कागद, स्टेशनरी घेणे हीदेखील लाचच 

गोवावेस जलतरण तलावाबाबत महापालिका व रोटरी क्‍लबमध्ये काही महिन्यांपासून संघर्ष सुरु आहे. त्या तलावाचा ताबा घेण्याचा प्रयत्नही महापालिकेने केला होता. पण, चर्चेतून त्यावर तोडगा काढण्याचा प्रस्ताव रोटरीने महापालिकेसमोर ठेवला आहे. अशा स्थितीत ग्राहक न्यायालयाने 2015 मधील घटनेला महापालिका जबाबदार नसल्याचा निकाल दिला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy dead in goaves municipal corporation Swimming Pool