पोलिसच लागला तिच्या मागे चल फिरायला

पोलिसच लागला तिच्या मागे चल फिरायला

सातारा : जिल्हा पोलिस दलात चालक म्हणून कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. जितेंद्र निवृती कांबळे (रा. दत्तपंचशील कॉलनी, शाहूपुरी) असे त्याचे नाव आहे.

संबंधित महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. तिचे पती कामानिमित्त परराज्यात असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. त्यानंतर कांबळे हा 2014 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत वारंवार पाठलाग करत असल्याचे, फोटो काढत होता, तसेच सोबत बाहेर फिरायला येण्यासाठी छेडत असल्याचे संबंधित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. 
 

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा 

सातारा : विनयभंग करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आठ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकुंद सीताराम त्र्यंबके, रवींद्र साबळे, सदाशिव दळवी, सुनीलकुमार माने, महामुनी, जितेंद्र जगदाळे, आफिया शेख व तिची आई (रा. कोरेगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 
एप्रिल 2016 ते 6 जानेवारी 2020 पर्यंत वेळोवेळी कृष्णानगर येथे तसेच महसूल कार्यालयातील अधिकारी मुकुंद त्र्यंबके, रवींद्र साबळे, सदाशिव दळवी, सुनीलकुमार माने, उपकार्यकारी अभियंता कोरेगावचे महामुनी व एचआर, कोरेगाव जितेंद्र जगदाळे यांनी संगनमत करून वारंवार लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच आफिया शेख व तिची आई यांनी सरकारी कामात अडथळा आणून ऑफिसमध्येच मारहाण व शिवीगाळ केल्याचे संबंधित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आठ जणांवर विनयभंग करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप बधे तपास करत आहेत. 

वाचा : "बुलाती है मगर जानेका नहीं"


विवाहितेच्या छळप्रकरणी गुन्हा दाखल 

सातारा : चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तिघांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पती सलिम यासिन मुलाणी, सासू सुगराबी यासीन मुलाणी, नणंद नूरजहॉं हसन पठाण (सर्व रा. शहापूर, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत रेश्‍मा सलिम मुलाणी (वय 29, रा. शहापूर, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. घरगुती कारणावरून तसेच त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन सर्व संशयित शारीरिक, मानसिक त्रास देत होते. तसेच मारहाण करून शिवीगाळ करत होते. शनिवारी (ता. 22) रात्री आठच्या सुमारास पतीने उजव्या खांद्यावर व पायावर सुरीने वार करून जखमी केले, असे रेश्‍मा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

महसूल बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

सातारा : कृष्णा नदीच्या पात्रातून वाळूची चोरी करून शासनाचा महसूल बुडवल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मंगेश भिकू नवघणे (वय 31, रा. वासोळे, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (ता. 21) पहाटे एक ते सकाळी आठच्या दरम्यान क्षेत्रमाहुली (ता. सातारा) येथील कृष्णा नदीच्या पात्रातून अनोळखी व्यक्तीने वाळूचे अवैध उत्खनन करून चोवीस हजार रुपये किमतीची सहा ब्रास वाळू चोरून नेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

वाचा : महिलांनी अन्यायाविरोधात धाडसाने पुढे यावे : तेजस्वी सातपुते 

हेही वाचा : भिऊ नका : पोलिस दल महिलांच्या पाठीशी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com