निपाणीच्या राजकारणातील मोठी बातमी; विधानसभा निवडणुकीबाबत काकासाहेब पाटलांनी केली मोठी घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress Former MLA Kakasaheb Patil

'काँग्रेस पक्षानं आतापर्यंत आपल्याला पाचवेळा संधी दिली आहे. त्यामध्ये तीनवेळा यशस्वी झालो.'

निपाणीच्या राजकारणातील मोठी बातमी; विधानसभा निवडणुकीबाबत काकासाहेब पाटलांनी केली मोठी घोषणा

निपाणी (बेळगांव) : काँग्रेस पक्षानं (Congress) आतापर्यंत आपल्याला पाचवेळा संधी दिली आहे. त्यामध्ये तीनवेळा यशस्वी झालो. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत आपण व आपल्या कुटुंबातील कोणीही निवडणूक रिंगणात नसणार आहे. आमदार व माजी आमदार यांच्या मुलांना संधी न देता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिल्यास त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्र येणार असल्याची माहिती माजी आमदार काकासाहेब पाटील (Kakasaheb Patil) यांनी दिली. बुधवारी (ता. ३१) काँग्रेस कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

हेही वाचा: मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

हेही वाचा: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी पहिल्यांदाच केली आहे. त्यानुसार संभाव्य उमेदवारांच्या यादीत माजी नगराध्यक्ष, नगरसेवक विलास गाडीवड्डर, माजी सभापती व विद्यमान नगरसेवक बाळासाहेब देसाई-सरकार यांची नावं समाविष्ट केली आहेत. सुधारीत यादी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांच्याकडं पाठवत आहोत. पक्षश्रेष्ठी सांगतील त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काँग्रेसतर्फे सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सलग दोनवेळा आपला पराभव झाला असला तरी मताधिक्य वाढलं आहे. त्याचा विचार करून आपण नवोदित उमेदवारांची नावं हायकमांडांकडं पाठविली आहेत.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी

चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी, विधानसभा निवडणुकीसाठी सर्वेक्षण करण्यासाठी आता आठ जणांची यादी हायकमांडकडं पाठविली आहेत. त्यानुसार पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार संबंधित उमेदवाराला निवडून आणण्यासह काँग्रेस पक्षाला बळकटी आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. माजी नगरराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक विलास गाडीवडुर म्हणाले, गेल्या ३० वर्षांपासून माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण कार्यरत आहोत. त्यांनी सर्वसामान्यांना एकत्र करून पक्षाला बळकटी दिली आहे. यापुढील काळात राजकीय कुटुंबीय पुन्हा राजकारणात येण्याऐवजी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.

हेही वाचा: धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

Nipani Assembly Election

Nipani Assembly Election

हेही वाचा: पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार? माजी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

वीरकुमार पाटलांना पक्षानं अनेकवेळा संधी दिली

यापूर्वी माजी मंत्री वीरकुमार पाटील यांना पक्षानं अनेकवेळा संधी दिली आहे. आता त्यांनी आपलं मन मोठं करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी वरिष्ठाकडं केली आहे. यावेळी नगरसेवक बाळासाहेब देसाई-सरकार, डॉ. जसराज गिरे, संजय पावले, दत्ता नाईक, शेरू उर्फ सर्फराज बडेघर, शौकत मणेर, दिलीप पठाडे, दीपक सावंत, अनिस मुल्ला, माजी नाराध्यक्ष विजय शेटके यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

हेही वाचा: गणेशोत्सवाने घालवली प्राजक्ताच्या मनातली ही भीती...

Web Title: Congress Former Mla Kakasaheb Patil Withdraws From Nipani Assembly Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..