पांढऱ्या सोन्याने  पुन्हा आटपाडी बाजारपेठ फुलणार

Cotton market started now fulfill sangli marathi news
Cotton market started now fulfill sangli marathi news

झरे (सांगली) :  पांढरे सोने कापूस बाजपेठेतून हद्दपार झाले आहे.पांढरे सोने पुन्हा फुलवण्यासाठी मार्केट कमिटी ने पुढाकार घेतला आहे. मार्केट कमिटीचे शिष्टमंडळ अकोला कृषी विद्यापीठास भेट देऊन कृषी शास्त्रज्ञांच्या बरोबर बैठकीचे आयोजन केले आहे .

आटपाडी तालुका म्हटले की पांढरे सोने म्हणजेच कापूस सरसकट शेतकरी कापूस उत्पादक होते. परंतु बियानाची उगवणशक्ती कमी झाल्याने, किंवा बोगस बियाणे,  वातावरणात न उगवणारे बियाणे ,मार्केटमध्ये येऊ लागले त्यामुळे कापूस तालुक्यातून हद्दपार झाला आहे.तालुक्याचे ज्येष्ठ नेते राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अकोला येथील कृषी विद्यापीठातील कृषी तज्ञाची भेट घेऊन.आपल्या भागात वातावरणाशी निगडीत बियाणे तयार करण्यासाठी कृषीतज्ञां बरोबर बैठकीचे आयोजन केले आहे. लवकरच बैठक होणार आहे.अशी माहिती मार्केट कमिटीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड यांनी दिली.

हेही वाचा-कोल्हापूरचे ॲड. युवराज नरवणकर भारतातील सर्वोत्तम आणि प्रभावशाली फोर्ब्सच्या यादीत
आपल्याकडील वातावरणाशी निगडीत बियाणे कृषी तज्ञांनी कृषी कंपन्यांनी तयार करून देण्याचे मान्य केले आहे. त्यासाठी पुढील काही दिवसातच तालुक्याचे ज्येष्ठ नेते राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट कमिटीचे सर्व संचालक मंडळ व तालुक्यातील कृषी तज्ञ  अकोला येथील विद्यापीठास भेट देऊन चर्चा करणार आहेत.तालुक्यातील वातावरणानुसार ज्या बियाण्याची उगवण शक्ती आहे. असे बियाणे तयार करून देण्याचे कृषी कंपनी व कृषी तज्ञांनी मान्य केले आहे.अशी माहिती मार्केट कमिटीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड यांनी दिली यावेळी उपसभापती दिलीप खिलारी, सचिव  शशिकांत जाधव  व संचालक मंडळ उपस्थित होते.

कापूस बियाणे कंपनीशी व कृषीतज्ञ यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे .यासंदर्भात अकोला येथील कृषी विद्यापीठात कृषी तज्ञा बरोबर ज्येष्ठ नेते राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच बैठक होणार आहे. _भाऊसाहेब गायकवाड _ सभापती मार्केट कमिटी आटपाडी


आपल्या कडील वातावरणाशी निगडीत कापसाच्या बियाण्याची उगवणशक्ती असणारे बियाणे  कृषी तज्ञ शास्त्रज्ञ व कृषी विद्यापीठ बियाणे बनवून देणार असल्याचे मान्य केले आहे .त्यामुळे पुन्हा पांढऱ्या सोन्याने बाजारपेठ फुलतील

- दिलीप खिलारी उपसभापती मार्केट कमिटी आटपाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com