` या ` नगरसेवकांची करणी ; नियोजनावर पाणी 

` या ` नगरसेवकांची करणी ; नियोजनावर पाणी 
Updated on


सोलापूर ः मिळकतदांना बजावलेल्या दंडात तब्बल 75 टक्के सवलत देऊनही वसुलीच्या कामात काही नगरसेवक हस्तक्षेप करू लागले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होणार असून, कर्मचारीही त्रस्त झाले आहेत. पालिकेचे उत्पन्नवाढीसाठी आयुक्त दीपक तावरे यांनी एक पाऊल पुढे जाऊन तब्बल 75 टक्के सवलत  देण्याचा निर्णय घेतला, तरीही काही नगरसेवक वसुलीत हस्तक्षेप करू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, प्रशासनाच्या नियोजनावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. 

50 हजार थकबाकीदारांना लाभ 
स्मार्ट सिटी योजनेत पहिल्या यादीत समावेश झालेल्या सोलापूर शहरातील तब्बल 50 हजार थकबाकीदारांना त्यांना झालेल्या दंडामध्ये 75 टक्क्यांची सवलत मिळणार आहे. या संदर्भातील आदेश आयुक्त तावरे यांनी गेल्या आठवड्यात जारी केले. मिळकत कराची थकबाकी असेल तर दरमहा दोन टक्के दंड लावण्याची तरतूद राज्य शासनाने केली आहे. त्यानुसार आज (सोमवार)पासून सवलतीनुसार वसुली केली जाणार आहे. 

दंडाची रक्कम 58 कोटी रुपये
सोलापूर शहरातील गावठाण भागात 93 हजार 822 मिळकतदार आहेत. त्यापैकी 43 हजार 228 मिळकतदारांनी नियमित बिल भरले आहे. तर 50 हजार 594 मिळकतदारांना दोन टक्के दंड झाला आहे. ही थकबाकी 58 कोटी 94 लाख 72 हजार 183 इतकी आहे. या रकमपैकी 75 टक्के दंडाची रक्कम ही माफ केली जाणार आहे. मात्र त्यासाठी 29 फेब्रुवारीपर्यंत संबंधित मिळकतदाराने त्याच्याकडील सर्व थकबाकी एकवट भरणे आवश्यक आहे. 

नोटीस व वॅारंट फी पूर्णपणे माफ
दंडाच्या रकमेत 75 टक्के माफ करण्याबरोबरच नोटीस व वॅारंट फीही पूर्णपणे माफ केली जाणार आहे. शहर व हद्दवाढ भागातील मिळकतदारांकडे 3.81 कोटींची वॅारंट फी आणि 1.72 कोटींची नोटीस फी थकीत आहे. ही सर्व माफ होणार आहे. 

हद्दवाढीतील मिळकतदारांना 42 कोटींचा दंड
हद्दवाढ भागातील मिळकतदारांना आतापर्यंत 42 कोटींचा दंड झाला आहे. त्यापैकी 75 टक्के रक्कम आता माफ होणार आहे. शहर व हद्दवाढ मिळून एकूण दंडाची रक्कम सुमारे 100 कोटींची थकबाकी आहे. त्यापैकी जवळपास 75 कोटींचा दंड माफ होण्याची शक्यता आहे. शहर विभागात मार्चअखेरपर्यंत 228 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दीष्ट आहे. 32 पेठातील मिळकतदारांकडे 168 कोटी रुपयांची थकबाकी आणि चालू वर्षातील 60 कोटी रुपयांचा कर
आहे. येत्या मार्चअखेर ही रक्कम वसूल करण्याचे उद्दीष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why is Sagareshwar Wildlife Sanctuary famous?
Why are women paying extra for NCMC cards?
Devendra Fadnavis Sunil Tatkare Jayant Patil meeting
Who is Tukaram Mundhe?
Marathi News Esakal
www.esakal.com