धनगर समाजही लढविणार विधानसभा; वंचित देणार जागा

तात्या लांडगे
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

भाजप-शिवसेना युती होईल की नाही, युती झाल्यास अनेकजण बंडखोरीच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने काही मोजक्‍या जागा शिल्लक ठेवल्या असून, युतीच्या निर्णयानंतर नाराज इच्छुकांना त्या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार आहे, अशी चर्चा आहे.

सोलापूर : एमआयएमने वंचित बहुजन आघाडीशी काडीमोड घेतल्यानंतर ऍड. प्रकाश आंबेडकरांनी भाजप-शिवसेना युतीसह आघाडीला टक्‍कर देण्याच्या उद्देशाने 'धनगर कार्ड' खेळण्याचे नियोजन केले. सत्तेवर येण्यापूर्वी आरक्षणाचा शब्द देऊनही भाजपने मागील पाच वर्षांत धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. या पार्श्‍वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने राज्यातील 288 पैकी 54 मतदारसंघात धनगर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असून, त्यामध्ये सर्वाधिक जागा सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, नगर, बारामती, पुण्यातील आहेत. 25 सप्टेंबरला उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असून, त्यामध्ये मुस्लिम, दलितांसह अन्य जातीतील उमेदवारांचाही समावेश आहे.

एमआयएमने जागा वाटपाचा मुद्दा पुढे करुन वंचित बहुजन आघाडीची सोबत सोडली. त्यानंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलिल व आमदार वारिस पठाण यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल झाले. त्यावेळी भाजपची बी टीम वंचित बहुजन आघाडी की एमआयएम, अशीही चर्चा झाली. तरीही ऍड. आंबेडकरांनी किमान 30 मतदारसंघात मुस्लिम उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय घेतला. तर माजी आमदार लक्ष्मण माने यांनी वंचितमधून बाहेर पडत महाराष्ट्र वंचित आघाडीची स्थापना केली.

Video:‘एकच वादा अजितदादा’ घोषणेने बारामतीत मुख्यमंत्र्यांचे स्वागत

माने यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीसोबत यावे असा आग्रह धरला होता. मात्र, तो ऍड. आंबेडकरांना मान्य नव्हता. तरीही धनगर समाजासह अन्य वंचित समाजाच्या बळावर आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारला जागा दाखवण्याची तयारी वंचितने सुरु केली आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी पुण्यात झाडांची कत्तल!

सप्टेंबरपर्यंत 288 उमेदवार होणार जाहीर 

भाजप-शिवसेना युती होईल की नाही, युती झाल्यास अनेकजण बंडखोरीच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने काही मोजक्‍या जागा शिल्लक ठेवल्या असून, युतीच्या निर्णयानंतर नाराज इच्छुकांना त्या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार आहे, अशी चर्चा आहे.

वंचितने वेगळी खेळी करीत जातीनिहाय उमेदवार देण्याचे नियोजन केले आहे. मात्र, युती अन्‌ आघाडीचे उमेदवार निश्‍चित झाल्यानंतर वंचितच्या उमेदवारांची दुसरी व तिसरी यादी 30 सप्टेंबरपर्यंत जाहीर होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhangar community will contest Maharashtra Assembly Election