Sangli Crime : नशेच्या गोळ्यांची विक्री करणारा गुन्हेगार जेरबंद; संशयिताकडून 80 गोळ्या जप्‍त

शहरासह जिल्ह्यात नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांची संख्या वाढत आहे.
Narcotics Pills
Narcotics Pillsesakal
Summary

या गोळ्यांबाबत चौकशी केली असता डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसल्याचे आढळले.

सांगली : मिरजेतील मंगल चित्रमंदिरजवळ नशेच्या गोळ्यांची (Narcotics Pills) विक्री करणाऱ्या पोलिसांच्या (Miraj Police) रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात यश आले. या सराईताकडून ८० गोळ्या जप्त केल्या आहेत.

याप्रकरणी गौस हुसेन बागवान उर्फ गौस शेख (वय २५ रा. नदाफ गल्ली, मिरज) याला अटक करण्यात आली आहे. परिविक्षाधीन उपाधीक्षक संदेश नाईक, मनीषा कदम यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने (LCB) सापळा रचून सदरची कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरासह जिल्ह्यात नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांची संख्या वाढत आहे. या नशेच्या गोळ्या खाऊन गुन्हे करण्याचे प्रमाण देखील वाढले होते. याच पार्श्वभूमीवर अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

Narcotics Pills
Kolhapur : इथं विषयच हार्ड असतो! कोल्हापुरात 'फुटबॉल' ठरतोय राजकारणाचा केंद्रबिंदू; जाणून घ्या कारण

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक मिरजेत पेट्रोलिंग करत असताना कॉन्स्टेबल संजय कांबळे यांना माहिती मिळाली कि, रेकॉर्डवरील आरोपी गौस बागवान उर्फ शेख हा मंगल टॉकीज जवळ नशेच्या गोळ्यांची विक्री करत आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचारी व औषध निरीक्षक राहुल कारंडे यांच्यासह छापा टाकून गौस याला जेरबंद केले. त्याची कसून तपासणी केली असता त्याच्या जवळ गोळ्यांच्या आठ स्ट्रीप (प्रत्येक स्ट्रीप मध्ये दहा गोळ्या) मिळाल्या. या गोळ्यांबाबत चौकशी केली असता डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसल्याचे आढळले.

Narcotics Pills
Anil Babar : पक्षात सातत्यानं बंड पुकारणाऱ्या आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपद? राजकीय घडामोडींना वेग

तसेच सदरच्या गोळ्या या सांगलीतील कर्नाळ रोडवर राहणाऱ्या शहाबाज शेख उर्फ जॅग्वार यांच्याकडून विकत घेऊन ज्यादा दराने विक्री करत असल्याचे त्याने सांगितले. यावेळी नशेच्या ८० गोळ्यांसह गौस बागवान उर्फ शेख याला अटक करून त्याच्या विरोधात मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संजय कांबळे, राजू शिरोळकर, विरोबा नरळे, मच्छिंद्र बर्डे, संकेत मगदूम, अजय बेंदरे यांच्या पथकाने केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com