esakal | अतिवृष्टी हानीचा पुढील आठवड्यात केंद्राला अहवाल
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय पथक

अतिवृष्टी हानीचा पुढील आठवड्यात केंद्राला अहवाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : जिल्ह्यातील अतिवृष्टीसह पुरामुळे मोठी हानी झाली. खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. त्याची पाहणी आज (ता.५) केंद्रीय पथकाकडून करण्यात आली. दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या पथकाने खानापूर, हुक्केरी व गोकाक तालुक्यांना भेट दिली. पाहणीनंतर येत्या ८ दिवसांत नुकसानीचा अहवाल राज्य शासन केंद्राला पाठणार आहे, अशी माहिती दिली.

हेही वाचा: निपाणीतील गांधी रुग्णालय ‘ऑक्सिजन’वर

केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे मुख्य लेखपाल सुशील पॉल यांच्या नेतृत्वाखाली दाखल पथकाने शासकीय कार्यालयात बैठक घेतली. येथे अतिवृष्टी आणि पुरामुळे पीक, घर, रस्ते आणि इतर हानीची माहिती घेतली. पथकात केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक डॉ. के. मनोहरन, ऊर्जा विभागाचे शुभम गर्ग, कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आयुक्त मनोज आर्य यांचा समावेश होता.

हेही वाचा: 'सरकारला शेट्टींसोबतच्या शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे का?'

खानापूर, हुक्केरीला पथकाला दौरा

शासकीय कार्यालयातील बैठकीनंतर पथकातील अधिकाऱ्यांनी खानापूर तालुक्याचा दौरा केला. मारुतीनगरजवळ मलप्रभा ब्रीज, बॅरेजची पाहणी केली. पोल्ट्रीफार्म, पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे भेट दिली. हुक्केरी तालुक्यातील बागायत, पीकहानीची पाहणी केली. फळबाग, घर, पायाभूत सुविधा नुकसान संदर्भात तपशिल घेतला. जिनराळ क्रॉसला बागायत, बडकुंद्री होलेम्मा मंदिर, हिरण्यकेशीत घर, पायाभूत सुविधा नुकसानीची पाहणी केली केली.

यावेळी शेतकऱ्यांनी पथकाच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात कोबीचे पीक पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. टोमॅटो पिकाचेही नुकसान झाल्याने आर्थिक संकट ओढविले आहे. २० एकरात १२ टन पीक मिळायचे. पण, यंदा २ टन उत्पादन मिळत असल्याची व्यथा मांडली. खर्चही मिळाला नाही. यर्नाळ, इस्लामपूर, सुल्तानपूर, हरगापूरसह हुक्केरीतील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील नुकसानीची माहिती घेतली.

हेही वाचा: कोल्हापूर - पोलिसांची नजर चुकवत 2 पुरग्रस्तांचा जलसमाधीचा प्रयत्न

आठवड्यात केंद्राला अहवाल

बेळगाव जिल्ह्यातील हानीची पाहणी करण्यात आल्यानंतर येत्या आठ दिवसांत अहवाल केंद्राला दिला जाईल, अशी माहिती अभ्यास पथकाचे सुशील पॉल यांनी दिली. नुकसानीचा अहवाल घेण्यास सुरु असून, त्यावरून सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मदत जाहीर केली जाईल, असे सांगितले. पुढील आठवड्यात अहवाल पाठविला जाईल. कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आयुक्त मनोज आर्य यांनी ७६५ कोटी रुपयांचा केंद्र सरकारला दिला आहे. त्या प्रस्तावाच्या आधारे तीन सदस्यीय केंद्रीय पथकाकडून दौरा सुरू आहे. पीकहानीचे संयुक्त सर्व्हेक्षण केल्यानंतर सरकारी नियमानुसार भरपाई दिली जाईल, अशी माहिती दिली आहे.

यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन, प्रांताधिकारी रवींद्र कर्लिगन्नावर, शशिधर बगली, कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, पशुसंवर्धन उपसंचालक डॉ.अशोक कोल्हासह खानापूर, हुक्केरीचे तहसीलदार उपस्थित होते.

loading image
go to top