शेतकरी महिलेने 'यामुळे' केले विष प्राशन! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

सोलापूर : गहाण ठेवलेली तीन एकर जमीन सावकाराने परस्पर विकली. या प्रकरणात न्याय द्यावा, यासाठी प्रशासनाकडे सातत्याने हेलपाटे मारूनही काहीही होत नसल्याने हतबल झालेल्या सविता दामोदर बानोरे (वय 35, रा. निंबर्गी, दक्षिण सोलापूर) या शेतकरी महिलेने मंगळवारी (ता.26) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : जगातले सर्वांत उंचीवरचे पोस्ट ऑफिस आहे कोठे ? कोल्हापूरकर पोहोचले तिथे

सावकाराकडे गहाण ठेवली शेती 
सविता बानोरे यांच्या मालकीची निंबर्गीत आठ एकर शेती आहे. सहा वर्षांपूर्वी मुलीच्या लग्नासाठी त्यांनी व त्यांचे पती दामोदर बानोरे यांनी तीन एकर शेती सावकार तुकाराम राठोड यांच्याकडे गहाण ठेवून तीन लाख रुपये घेतले होते. सावकार राठोड यांनी दामोदर बानोरे यांना मारहाण करून जबरदस्तीने खरेदीखतावर सह्या करून घेतल्या. 

हेही वाचा : पिसाळलेला कुत्रा चावलेल्याने एका महिलेचा मृत्यू

आत्महत्येचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल 
या प्रकरणात न्याय मिळावा, यासाठी सविता यांनी तलाठी, तहसील कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला; पण त्यांना न्याय मिळत नव्हता. अखेरीस जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी सविता यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सविता बाणुरे या महिलेवर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer woman's suicide attempt