
जपानच्या नऊ वर्षाखालील क्रिकेटच्या टीममध्ये त्याची प्रथम निवड झाली. तिथे नॅशनल क्रिकेट अकॅडमी प्रशिक्षण चालू आहे. गोलंदाजीचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी त्याने पुणे येथील हेमंत किणीकर यांच्या एच. के. बाऊन्स अकॅडमीमध्ये पंधरा दिवसाचे प्रशिक्षण घेतले आहे.
मलकापूर (ता. कऱ्हाड) : मराठमोळा युगंधर जितेंद्र रेठरेकर जपानच्या क्रिकेट वासियांचा गळ्यातील ताईत बनला आहे. सध्या सुरू असलेल्या 19 वर्षाखालील वर्ल्डकप मध्ये तो जपानच्या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. मूळचा पाटण तालुक्यातील रेठरेकर वाडीतील युगंधरच्या कामगिरीने जिल्ह्याचा व राज्याचा लौकिक वाढला आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा ः धोनी म्हणतोय, पाणीपुरीला वेळ लागेल
जितेंद्र रेठरेकर हे यांचे मुळगाव रेठरेकरवाडी (ता. पाटण) आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. पदवीपर्यंतचे शिक्षण कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये झाले. एम.सी. ए. चे शिक्षण शासकीय तंत्र निकेतन येथे झाले. त्यानंतर ते पूणे येथील एका नामांकित कंपनीत नोकरीला लागले. कंपनीच्या वतीने त्यांना जपानमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ते जपानमध्येच कुटुंबासह स्थायिक झाले.
आवश्य वाचा ः चितळे उद्योगसमुहाचा आधारस्तंभ हरपला :काकासाहेब चितळे यांचे निधन..
युगंधरचा जन्म मुंबईमध्ये झाला. एका वर्षानंतर तो कुटुंबासहजपान येथे विस्थापित झाले. जितेंद्र रेठरेकर यांची क्रिकेटची आवड तिथेही गेल्यानंतर काही कमी झाली नाही. ते तेथे नेहमी क्रिकेट खेळायचे. क्रिकेटची आवड युगंधरला निर्माण झाली. क्रिकेटचे बाळकडू त्याला मिळाल्यानंतर त्याने क्रिकेटमध्ये प्रावीण्य मिळवायला सुरुवात केली.
हेही वाचा ः देवाळातील चाेरांना सातारा पाेलिसांचा प्रसाद
यावेळी त्याला नितीन खाणीवाले या सरांचे ही मार्गदर्शन लाभले होते. पंधरा वर्षाचा असताना त्याला गोलंदाजी मधील 'बेस्ट बॉलर' हा किताब मिळाला. वर्ल्ड कप निवड संघा मध्ये निवड होत असताना समोहा देशाबरोबर झालेल्या क्रिकेट मॅच मध्ये त्याने पाच विकेट घेतल्या होत्या. त्याला 'मॅन ऑफ द मॅच' हा पुरस्कार मिळाला होता.
आवश्य वाचा ः हे काय भलतंच, कोरोनामुळे वाचला कोंबड्यांचा जीव
युगंधर संघातील अष्टपैलू खेळाडू असून उजव्या हाताचा फलंदाज म्हणून ओळख आहे. 19 वर्षाखालील जपानच्या क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड कप मॅचेसमध्ये त्याने जपानच्या संघाकडून चांगली कामगिरी केली आहे.