स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार डॉ. गणेश देवी यांना जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

उंडाळे येथे दादासाहेब उंडाळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त 1976 पासून स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन भरवले जाते. अधिवेशनाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवरील नामवंत विचारवंत, साहित्यिकांसह मान्यवरांनी याठिकाणी येऊन आपले विचार व्यक्त करीत असतात.

कऱ्हाड ः या वर्षीचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार साहित्य, समीक्षक व भाषाशास्त्रज्ञ डॉ. गणेश देवी यांना जाहीर झाला आहे. 51 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. उंडाळे येथे 18 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 37 व्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशनात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी सहकारमंत्री विलासराव पाटील- उंडाळकर यांनी पत्रकार परिषदेत येथे  दिली. डॉ. देवी यांना नवी दिल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्‍लेषक व शेतकरी नेते योगेंद्र यादव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

उंडाळे येथे दादासाहेब उंडाळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त 1976 पासून स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन भरवले जाते. अधिवेशनाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवरील नामवंत विचारवंत, साहित्यिकांसह मान्यवरांनी याठिकाणी येऊन आपले विचार व्यक्त केले आहेत. यापूर्वी पुरस्काराने स्वातंत्र्यसेनानी एन. जी. गोरे, श्रीमती उषा मेहता, गोविंदभाई श्रॉफ, निर्मलाताई देशपांडे, जी. पी. प्रधान, प्रभाकररावजी कुंटे, सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया, शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर, अण्णा हजारे, शांताराम गरुड, निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत, कृषितज्ज्ञ डॉ. जयंत पाटील, डॉ. अभय बंग, डॉ. प्रकाश आमटे, निळकंठ रथ, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यासह विभूतीना सन्मानित करण्यात आले आहे.''

जरुर वाचा -  डॉ. गणेश देवी यांच्या विषयी

अवश्य वाचा -  काळजाला भिडतेय स्मशानातील माया

डॉ. देवी बडोदा येथील भाषा संशोधन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आहेत. राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. देशातील बोलीभाषा व नष्ट होत चाललेल्या 780 भाषांवर त्यांनी संशोधन करून त्या भाषांना मान्यता प्राप्त करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. साहित्य अकादमीचाही देश पातळीवरील मानाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. अशा या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भाषाशास्त्रज्ञ, विचारवंत, सांस्कृतिक नेत्याचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

नक्की वाचा -  संपत्तीच्या हव्यासापोटी सारेकाही

वाचा - ...तर देशातील मुस्लिमांचेही नागरिकत्त्व रद्द होईल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Freedom Fighter Dada Undalkar Award Declared To Dr. Ganesh Devi