Vidhan Sabha 2019 : पडळकरांचा "वंचित'ला रामराम 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

लोकसभा निवडणुकीवेळी भाजप त्याग करून वंचित विकास आघाडीच्यावतीने सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणूक लढवणारे गोपीचंद पडळकर यांनी आज पुन्हा "वंचित'चा त्याग केला.

सांगली : लोकसभा निवडणुकीवेळी भाजप त्याग करून वंचित विकास आघाडीच्यावतीने सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणूक लढवणारे गोपीचंद पडळकर यांनी आज पुन्हा "वंचित'चा त्याग केला. आज त्यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केली नाही मात्र त्यांनी दोन दिवसात कार्यकर्त्यांचे व धनगर समाजातील नेत्यांचे मत ऐकून घेऊन पुढील राजकीय निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले.  

Pune Rain : पुणेकरांना तात्काळ मदत देवू : मुख्यमंत्री

पडळकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले,"धनगर समाजाचा अनुसुचित जातीमध्ये समावेश करावा यासाठीचा माझा लढा यापुढेही कायम राहणार आहे. तथापि हे आरक्षण भाजपच देऊ शकतो असे मला जाणवले. तथापि वंचित विकास आघाडीत राहून मला हे आरक्षण मिळवणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे सध्या आघाडीचे काम थांबवले आहे. गेल्या दोन महिन्यापासून मी वंचितच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी नव्हतो. माझी नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी कोणतीही तक्रार नाही. मला त्यांच्याबद्दल आदरच आहे. मला लोकसभेला तीन लाखांवर मते देणाऱ्या सर्व मतदारांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. मात्र माझा लढा धनगर आरक्षणासाठी असल्याने मी पुढील निर्णय घ्यावा असा कार्यकर्त्यांचा दबाव होता. त्यामुळे मी आता आघाडी सोडण्याची निर्णय घेतला आहे.'' 

रामराजेंच्या 'नो कॉमेंट्‌स' मागे दडलंय काय? 

पडळकर यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप प्रवेशाबद्दल थेट भाष्य केले नाही मात्र त्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याबाबतही त्यांनी भाष्य टाळले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gopichand Padalkar leaves vanchit bahujan aghadi