न्यायासाठी गुरुजींची आयुक्तांकडे धाव... 

The Guru will go to the Commissionerate
The Guru will go to the Commissionerate

नगर ः जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सुमारे 183 शिक्षकांनी बदलीप्रक्रियेवर हरकती नोंदविल्या होत्या. या हरकतींवर सात सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. मात्र, त्याचा अद्यापि निकाल लागला नाही. हरकतींवर दोन दिवसांत निकाल दिला नाही, तर त्याविरोधात आयुक्तांकडे अपील करण्याचा निर्णय काही शिक्षकांनी घेतला आहे. 

बदली प्रक्रियेत त्रुटी
जून महिन्यात झालेल्या शिक्षकांच्या बदलीप्रकियेत त्रुटी आहेत. काहींना ऑनलाइन भरलेल्या अर्जात एकही शाळा मिळाली नाही. दुसरीकडे, एका शाळेवर दोघांच्या बदल्या झाल्या. या बदलीप्रक्रियेवर अनेकांनी हरकती नोंदविल्या. बदलीनंतर सात दिवसांत हरकती घेऊन त्यावर एका महिन्यात सुनावणी घ्यावी, असा आदेश सरकारने बजावला होता. 

तीन महिन्यांनंतरही निकाल मिळेना 
तीन महिन्यांनंतर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांच्यासमोर सुनावणी झाल्यानंतर लगेच निकाल जाहीर होणे गरजेचे होते. मात्र, अद्यापि निकाल लागला नाही. सुनावणीचा निकाल मिळावा, यासाठीच आता काही शिक्षकांनी आयुक्तांकडे धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या दोन दिवसांत निकाल जाहीर झाला नाही, तर शिक्षक आयुक्तांकडे अपील करणार आहेत. 

फाइल पुढे जायला उशीर का? 
शिक्षण व सामान्य प्रशासन विभागाच्या खेळात शिक्षकांचा निकाल अडकला आहे. शिक्षण विभागाकडून सामान्य विभागाकडे व सामान्य विभागाकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे फाइल जायला दोन महिन्यांचा कालावधी लागतो का, असा प्रश्‍न शिक्षकांमधून उपस्थित केला जात आहे. 

फाइलचा मुक्काम कोठे? 
सुनावणीनंतर ती फाइल शिक्षण विभागाकडे जाऊन परत सामान्य प्रशासनाकडे सादर होणार होती. सामान्य प्रशासनाकडून ती तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी जाणार होती. त्यानंतर सामान्य प्रशासनाकडून हा निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र, या फाइलचा मुक्काम मध्येच कोठे तरी वाढला आहे. 

निकालाला विलंब झाला 
शिक्षकांच्या सुनावणीनंतर निकालाबाबत विलंब झाला आहे. विलंबाच्या कारणांबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. 
- जगन्नाथ भोर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com