Video : स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलीवर आलीय 'ही' दुर्दैवी वेळ!

Video : स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलीवर आलीय 'ही' दुर्दैवी वेळ!
Updated on

सोलापूर : स्वातंत्र्यसैनिक (स्व.) भगवान वानकर यांची मुलगी असलेल्या हिराबाई वानकर यांना वृद्धावस्थेत अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. 80 वर्षीय हिराबाईंचा सांभाळ करण्यासाठी कुटुंबातील कोणीच नसल्याने त्या बेघर झाल्या आहेत.

पाहा व्हिडिओ..​

​  
हेही वाचा -  अश्‍लील इमोजीमुळे अडकला फेसबुक फ्रेंड!

परिसरातील नागरिकांकडून देखभाल
हिराबाई यांच्या कुटुंबातील सध्या कोणीच नसल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून हिराबाई जगदंबा चौक परिसरातील रोटे कॉम्प्लेक्‍स मागे उघड्यावर राहण्यास आहेत. त्या स्वातंत्र्यसैनिक (स्व.) भगवान विश्‍वनाथ वानकर यांच्या मुलगी आहेत. या परिसरातील रहिवासी रंजना गायकवाड, राजू सुपेकर हे वृद्ध हिराबाई यांची देखभाल करत आहेत. 

हेही वाचा - लोकांचे पैसे बुडवण्यासाठी केला चोरीचा बनाव! 

अत्यंत वाईट परिस्थिती
देहदान चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते नारायण दुमालदार आणि सी. एस. सोलापुरे यांनी नुकतीच हिराबाई यांची भेट घेऊन विचारपूस केली. हिराबाईंचा सांभाळ करण्यासाठी कोणीही नसल्याने त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आयुष्य जगावे लागत आहे. या वयातही त्या प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाला शासकीय कार्यक्रमासाठी आवर्जून जातात. माझे वडील स्वातंत्र्यसैनिक होते असे त्या अभिमानाने सांगतात. हिराबाई सध्या ज्या ठिकाणी राहण्यास आहेत, तो परिसर खूपच अस्वच्छ आहे. 

सध्या हिराबाई यांना लोकमंगल अन्नपूर्णा योजनेतून रोज दोन वेळचा जेवणाचा डबा मिळत आहे. काही मदत हवी आहे का, असे विचारल्यानंतर हिराबाई यांनी नको असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात त्यांना आश्रय मिळणे गरजेचे असल्याचे श्री. दुमालदार यांनी सांगितले. महाराष्ट्र

स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील सदस्याची अशाप्रकारे वाताहत होणे योग्य नाही. अवयवदान प्रक्रियेच्या निमित्ताने आमची हिराबाई यांच्याशी भेट झाली. त्यांची अवस्था पाहून मनाला वाईट वाटले. शासनाने किंवा सामाजिक संस्थांनी हिराबाई यांना मदत करायला हवी. 
- नारायण दुमालदार, 
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli wall collapse
mistaken identity police case
Usha Pawar’s Inspirational Journey: Success in SSC Exam at the Age of Sixty
Monsoon rain Weather imd Alert
Marathi News Esakal
www.esakal.com