थॅंक्यू 'सकाळ'; कोरोनाच्या विळख्यातून परतलेल्या भारतीयांची भावना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

चीनमधील आपले नातेवाईक कधी परत येणार याची पालकांना काळजी होती. त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यामुळे ते आता भारतात परतले आहेत. आज (गुरुवार) दिल्लीत परतल्यानंतर भारतीय कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेना असा झालाय. अश्विनी पाटीलने मायदेशी आल्याचा सर्वाधिक आनंद झाल्याचे सांगत सकाळ माध्यम समूह आणि सहकार्य केलेल्यांचे आभार मानले आहेत. 

सातारा ः भारतीय वायू सेनेच्या विशेष विमानाने आज (गुरुवार) सकाळच्या प्रहरी चीनच्या वुहान शहरातून 76 देशवासियांना भारतात आणण्यात आले आहे. याममध्ये आठ महाराष्ट्रयीन नागरीकांचा समावेश आहे. या भारतीयांना काही दिवसांसाठी वेगळे ठेवण्यात येणार असून, लष्कर आणि इंडो-तिबेटी सीमा पोलिसांनी तयार केलेल्या दोन विशेष केंद्रांमध्ये ही व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या महत्वाच्या गाेष्टींच्या पुर्तता करण्याचे काम सुरु आहे.
 
कोरोना व्हायरस असलेल्या चीनमधील वुहानमध्ये दहा फेब्रुवारीपासून मी देशवासियांना मदतीची हाक देत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून साद घालत होती. या माझ्या हाकेला उत्तम प्रतिसाद मिळाला. मी आणि माझे देशवासीय आज (गुरुवार) मायदेशात परतलाे आहाेत. कोरोना साथ सुरू झाल्यापासून चीनमध्ये अडकलेल्या मी व माझ्यासह सुमारे 90 देशवासियांना जे धैर्य दिले ते आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही असे सकाळशी बाेलतना अश्विनीने नमूद केले.

आज (गुुरुवार) सकाळी दिल्लीत पाेहचल्यानंतर अश्विनीने ट्विट देखील केेले आहे. तिने परराष्ट्रमंत्री डाॅ. एस. जयशंकर यांच्या ट्विटवर अखेर मायदेशी परतल्याचे नमूद केले आहे. दिल्लीत परतल्यानंतर भारतीय कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेना असा झालाय. अश्विनी पाटीलने मायदेशी आल्याचा सर्वाधिक आनंद झाल्याचे सांगत सकाळ माध्यम समूह आणि सहकार्य केलेल्यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा : ...म्हणून अतिक्रमण कारवाईत हवालदाराने लावली जीवाची बाजी

दरम्यान बुधवारी (ता. 26) रात्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही चीनला वैद्यकीय मदत घेऊन जाणारे आणि अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी गेलेले विमान चीनमधील वूहान येथे उतरले आहे. काही वेळातच नव्वदपेक्षा अधिक भारतीय आणि आठ मराठी नागरिक परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील असे ट्विट केले हाेेते.

वाचा : ऐका : मी काय अशी तशी वाटले का ? दाेन लाख सत्तर हजारच पाहिजेत

हेही वाचा : अखेर मृत्यूच्या दाढेतून भारतीय परतणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IAF Flight Brought Back 76 Indians From Vuhan