esakal | लाल परीची स्टेअरिंग लवकरच 'ती' च्या हातात
sakal

बोलून बातमी शोधा

लाल परीची स्टेअरिंग लवकरच 'ती' च्या हातात

महिला सक्षमीकरणांतर्गत महामंडळाने २०१९ मध्ये महिला चालक कम वाहक अशी भरती केली होती. त्यामध्ये १६३ महिलांची नियुक्ती राज्यभरातून करण्यात आली.

लाल परीची स्टेअरिंग लवकरच 'ती' च्या हातात

sakal_logo
By
घनशाम नवाथे

सांगली : सायकल, दुचाकी, चारचाकीनंतर आता 'ती'च्या हाती एसटीचे 'स्टेअरिंग' आले आहे. त्यामुळे अवघड घाट, वेगवान राष्ट्रीय महामार्ग आदी ठिकाणी ती लालपरी सफाईदारपणे चालवताना लवकरच दिसेल. लॉकडाऊनमुळे एसटीने निवडलेल्या महिला चालक कम वाहकांच्या हाती येणारे 'स्टेअरिंग' लॉक झाले होते. परंतु त्यांच्या प्रशिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सांगली विभागात दहा महिला चालक कम वाहक दाखल झाल्या आहेत. त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. दोन वर्षांपासून एसटी महामंडळामध्ये चालक कम वाहक अशीच भरती केली जाते.

हेही वाचा: सांगली बंद उठवण्याबाबत खलबते, रात्री उशीरा निर्णय अपेक्षित

महिला सक्षमीकरणांतर्गत महामंडळाने २०१९ मध्ये महिला चालक कम वाहक अशी भरती केली होती. त्यामध्ये १६३ महिलांची नियुक्ती राज्यभरातून करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते या महिलांना नियुक्तीपत्रे दिली. त्यानंतर या महिलांना हाती 'स्टेअरिंग' होण्याची प्रतीक्षा होती. परंतु मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर एसटीचे चाक जागेवरच थांबले. पाठोपाठ चालक महिलांना मिळणारे प्रशिक्षणही 'लॉक' झाले. कोरोनाची पहिली लाट, त्यानंतर यंदाची दुसरी लाट यामुळे चालक महिलांना नियुक्तीची प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर प्रशिक्षणाचा मार्ग नुकताच मोकळा झाला आहे.

हेही वाचा: सांगली, मिरजेला बस परत; कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कडक बंदोबस्त

राज्यातील विविध विभागात महिला चालकांना एसटी चालवण्याचे प्रशिक्षण, तसेच अंतर्गत कामांची माहिती दिली जाणार आहे. सांगली विभागात दहा महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या विदर्भ आणि मराठवाडा परिसरातील आहेत. या महिलांना ३०० दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

हेही वाचा: तासगाव-सांगली रोडवरील कोल्ड स्टोअरेजला भीषण आग

डोंगर दऱ्यातून तसेच राष्ट्रीय महामार्गावरून एसटी चालवणे सोपे नाही. त्यामुळे खडतर प्रशिक्षण आवश्‍यक असते. दररोज जवळपास ३०० किलोमीटरपर्यंत बस चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच एसटी गाड्यांची अंतर्गत माहिती, देखभाल दुरुस्ती, आगारातील कामाची ओळख आदिंचा देखील प्रशिक्षणात समावेश असतो.

हेही वाचा: सांगली - जतचे माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे निधन

या सर्व प्रशिक्षणानंतर चाचणी घेऊन सारथ्य करण्याची संधी दिली जाणार आहे. 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरवण्यासाठी आता महिला चालक कम वाहक म्हणून कार्यरत राहणार आहेत. आणखी दिवसाच्या प्रतीक्षेनंतर 'ती'च्या हाती लालपरीचे 'स्टेअरिंग' पाहून पाहणाऱ्यांवर चकीत होण्याची वेळ येईल.

हेही वाचा: सांगली डॉट कॉम; महापालिका प्रशासन आरोपांच्या पिंजऱ्यात

चाचणीनंतरच हाती स्टेअरिंग

३०० दिवसांच्या प्रशिक्षणानंतर प्रत्यक्षात प्रवासी वाहतुकीची संधी देण्यापूर्वी तज्ज्ञ अधिकाऱ्यांमार्फत चाचणी घेतली जाईल. त्यामध्ये घाट चढ-उतार, सायंकाळच्या अंधारात बस चालवणे, राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी ३० किलोमीटरची चाचणी महिलांना द्यावी लागेल. त्यामुळे उत्तीर्ण झाले तरच हातात स्टेअरिंग अन्यथा वाहक म्हणून किंवा इतर कामासाठी नियुक्ती केली जाणार आहे.

हेही वाचा: सांगली : अॅपेक्स हॉस्पिटल रुग्ण मृत्यु प्रकरणी आणखी दोघांना अटक

कोरोनाच्या संकटामुळे चालक कम वाहक महिलांचे प्रशिक्षण थांबले होते. परंतु आता प्रशिक्षण सुरू झाले आहे. थेअरी व प्रॅक्टिकल असे त्याचे स्वरूप आहे. प्रशिक्षण व चाचणीनंतर त्यांच्या हाती स्टेअरिंग येईल.

- अरुण वाघाटे, प्रभारी विभाग नियंत्रक, सांगली

loading image