Islampur : राष्ट्रवादीत फक्त पै-पाहुण्यांचं राजकारण चालतं म्हणत महाडिक गटाचा भाजपात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फक्त पै-पाहुण्यांचे राजकारण चालते. शिफारशीशिवाय काम होत नाही.
Islampur Election NCP group join BJP
Islampur Election NCP group join BJPesakal
Summary

सूरज मोरे हे पैलवान आहेत. त्यांनी भल्या-भल्यांना चितपट केले आहे.

इस्लामपूर : रेठरे हरणाक्ष गावातील सर्वसामान्य ग्रामस्थांच्या पाठीशी महाडिक परिवार (Mahadik Group) सदैव राहील. दिवंगत नानासाहेब महाडिक यांच्या विचाराने पुढील पंचवार्षिक निवडणुकीत (Islampur Election) महाडिक गट प्रभावी राहील, हे नक्की आहे.

ग्रामस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाडिक बंधू कटिबद्ध असल्याचा विश्वास जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनी दिला. वाळवा तालुक्यातील (Walwa Taluka) रेठरे हरणाक्ष येथील राष्ट्रवादीच्या (NCP) एका गटानं भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला, यावेळी ते बोलत होते.

Islampur Election NCP group join BJP
Rishikant Shinde : राष्ट्रवादीत गद्दारी, पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळंच मी शिवसेनेत प्रवेश केला; शिंदेंच्या भावाची कबुली

महाराष्ट्र प्रदेश कार्य समिती सदस्य सम्राट महाडिक, माजी जिल्हा परिषद सदस्य जगन्नाथ माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. सूरज मोरे, अधिक मोरे यांनी कार्यकर्त्यांसह महाडिक गटात प्रवेश केला. यावेळी भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. राहुल महाडिक म्हणाले, "सूरज मोरे हे पैलवान आहेत. त्यांनी भल्या-भल्यांना चितपट केले आहे. यापुढे महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून युवकांच्या हाताला काम देऊ."

Islampur Election NCP group join BJP
Factory Election : शिवसेनेचे खासदार संजय मंडलिकांची बिनविरोध निवड; निवडणुकीतून 'इतक्या' उमेदवारांनी घेतली माघार

सम्राट महाडिक म्हणाले, "सूरज मोरे, अधिक मोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांची भाजपप्रवेशाची चर्चा तालुकाभर रंगली होती. " यावेळी महाडिक क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप पाटील, बबन शिंदे, संदीप पाटोळे, सुनील सोनवले, सुजित थोरात, सूरज मोरे, सुशील सावंत, चंद्रशेखर तांदळे, गणेश शेवाळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Islampur Election NCP group join BJP
Nanded : आंबेडकर जयंती केली म्हणून दलित तरुणाची निर्घृण हत्या; अशोक चव्हाण म्हणाले, 'वातावरण खराब करू नका'

'जशाच तसे उत्तर देऊ....'

सम्राट महाडिक म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फक्त पै-पाहुण्यांचे राजकारण चालते. शिफारशीशिवाय काम होत नाही. यापुढे आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला, तर जशाच तसे उत्तर देऊ. पक्ष, जात-पात न मानता जनतेच्या प्रश्नासाठी धाऊन जावा, आवाहन त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com