कर्नाटकातून चंदगड, कोवाडसह कोल्हापुरात बससेवा होणार सुरू

बससेवा
बससेवा sakal

बेळगाव : महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी कोरोना चाचणी अहवाल सक्ती मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटक वायव्य परिवहन महामंडळाने देखील महाराष्ट्रात पूर्णक्षमतेने बससेवा सुरू करण्यासाठी आपल्या हालचाली गतिमान केल्या आहेत. बेळगावातून चंदगड, कोवाड आणि कोल्हापुरातही बसेस सोडल्या जाणार आहेत.

Summary

महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांना कोरोना अहवालाची सक्ती मागे घेतली.

सध्या महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे कर्नाटक परिवहन मंडळाने आपल्या बसेस महाराष्ट्रात सोडल्या नाहीत. आंदोलन मागे घेण्याची घोषणा होताच बेळगावातून महाराष्ट्रात बससेवा सुरू होणार आहे. कर्नाटक शासनाने काल (ता. ९) महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांना कोरोना अहवालाची सक्ती मागे घेतली. त्यामुळे काल रात्रीपासूनच महाराष्ट्रात बससेवा सुरू करण्यासंबंधी वायव्य परिवहन मंडळाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पण महाराष्ट्र एसटी कर्मचारी आंदोलनामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला.

बेळगाव विभागातून रोज ९२ बसेस महाराष्ट्रात धावतात. तर चिक्कोडी विभागातून ९८ बसेस महाराष्ट्रात ये-जा करतात. महाराष्ट्रातून 78 लालपरी कर्नाटकात धावतात. बसेसची ही संख्या पाहता कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱ्या बसेसची संख्या अधिक आहे. बेळगाव विभागाला दररोज या फेरीतून पंधरा ते अठरा लाख रुपयांचा महसूल प्राप्त होतो. बेळगाव विभागाचा तसेच वायव्य परिवहन महामंडळाचा नफा आणि तोट्याचा हिशेब हा महाराष्ट्र आणि कर्नाटक आंतरराज्य सेवेवरच अवलंबून आहे. चंदगड आणि कोवाड भागातील अनेक गावांना वायव्य परिवहन महामंडळाच्या बसेसना जोडले गेले आहे. त्यामुळे बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू व्हावी यासाठी परिवहन मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत.

बससेवा
शाळा सुट्टीचा अखेरचा दिवस; किणी टोल नाक्यावर वाहनांची रांगच रांग

सध्या केवळ परिवहन मंडळाला महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचा संप सुटण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. कर्नाटकातून महाराष्ट्रात पूर्णक्षमतेने बससेवा सुरू होताच महाराष्ट्रातूनही पूर्ण क्षमतेने बेळगावात बससेवा दिली जाणार आहे. महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणखी दोन दिवसात समाप्त होण्याचा अंदाज कर्नाटक परिवहन महामंडळाकडून वर्तविला जात असून पुढील एक-दोन दिवसात पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू होणार आहे.

लाल परी येणार बेळगावात

कोरोना सक्ती अहवालामुळे लालपरीची चाके कर्नाटकच्या दिशेने थांबली होती. केवळ कर्नाटकातून बसेस महाराष्ट्रात धावत होत्या. मात्र त्यांची संख्या देखील कमी होती. केवळ पुणे, मुंबई, शिर्डी आणि सोलापूर येथे ही सेवा होती. कोल्हापुरात कर्नाटक बस धावत नव्हती. आता कोरोना चाचणी अहवाल रद्द झाला असल्यामुळे लालपरीचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com