कसबा तारळे विठ्ठलाई, सिद्धेश्‍वर यात्रा रद्द..

Kasba Tarela Vitthalai Siddheshvar festival canceled kolhapur marathi news
Kasba Tarela Vitthalai Siddheshvar festival canceled kolhapur marathi news
Updated on

कसबा तारळे/ जयसिंगपूर (कोल्हापूर) : कोरोनाच्या गर्दीमुळे होणारा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी राधानगरी तालुक्‍यातील कसबा तारळे येथील श्री विठ्ठलाई यात्रा रद्द करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाबाबतची माहिती गैबी- विठ्ठलाई खेळे मंडळाचे (पारंपरिक यात्रा उत्सव समिती) अध्यक्ष धोंडिराम कामत व सरपंच अशोक कांबळे यांनी दिली. तसेच, जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा रद्द केली असून, केवळ पालखी सोहळा साजरा होणार असल्याचा निर्णय आज घेण्यात आला. राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. 

दुर्गमानवाड यात्रा रद्द
दुर्गमानवाड व कसबा तारळे येथील जागृत देवस्थान, अशी पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकण व कर्नाटक सीमाभागातील भाविकांत श्रद्धा असणाऱ्या देवी विठ्ठलाईची यात्रा अनुक्रमे २२ व २३ एप्रिलला नियोजित होती. तालुका प्रशासनाने दुर्गमानवाड येथील यात्रा उत्सव समितीबरोबर बैठक घेऊन दुर्गमानवाडची यात्रा रद्द करण्याचे जाहीर केले होते. 

सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द​


दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच यात्रा, जत्रा, उरूस, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले जाणार असल्याचे कळविल्याने आज येथील ग्रामपंचायतीत सरपंच, सदस्य, गैबी- विठ्ठलाई खेळे मंडळाचे पदाधिकारी यांची बैठक झाली. बैठकीत यात्रोत्सवानिमित्ताने आजपासून सुरू होणारे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केल्याचा व फक्त परंपरागत धार्मिक विधी रीतिरिवाजाप्रमाणे करण्याचा निर्णय झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com