अभिमानास्पद! 'या' खेड्यातली डाळिंब गेले  युरोपीय बाजारपेठेत..! 

Katphal pomegranate in European market
Katphal pomegranate in European market

महूद (सोलापूर) : कटफळ (ता. सांगोला) येथील युवा शेतकरी सागर नंदकुमार शेळके यांचे डाळिंब युरोपीय बाजारपेठेत निर्यात करण्यात आले. योग्य काटेकोरपणे नियोजन केल्याने हे शक्‍य झाल्याचे सागर शेळके यांनी सांगितले. 

हेही वाचा : बलात्कार्यांचा जागेवर 'फैसला'
यशस्वी नियोजन

श्री. शेळके या युवा शेतकऱ्याने युरोपीय बाजारपेठेत पाठवण्यासाठी निर्यातक्षम डाळिंबाचे यशस्वी नियोजन करून पीक घेतले आहे. सुरवातीच्या काही काळात टॅंकरने पाणी घालून डाळिंब बागा जगवल्या आहेत. मात्र, इतरांपेक्षा काहीतरी वेगळा व यशस्वी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. या प्रयत्नातून त्यांनी निर्यातक्षम डाळिंबाचे यशस्वी उत्पन्न घेतले आहे. 

हेही वाचा : कशामुळे हे गाव पडले ओस...
दोन एकरात ७०० झाडे

सागर शेळके यांची कटफळ येथे सात एकर शेती आहे. त्यापैकी दोन एकरांत डाळिंबाची 700 झाडे आहेत. पाण्याचे स्रोत म्हणून एक विहीर आणि बोअर आहे. डाळिंबाचे हे चौथे पीक असून सुमारे 15 टन उत्पन्न निघाले आहे. त्यापैकी सुमारे 70 टक्के माल युरोपीय बाजारपेठेत पाठवला असून बाकीचा 30 टक्के माल स्थानिक बाजारपेठेत विकला आहे. निर्यातक्षम डाळिंबास दरही चांगला मिळाला असून सरासरी 100 रुपये दराने एकूण उत्पन्न सुमारे 15 लाख रुपये मिळाले आहे. 

हेही वाचा : अवघडचंय ! कामाचा व्याप ३८३ गावांचा अन् कर्मचारी फक्त २१
दुष्काळाशी दोन हात

मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करून योग्य नियोजन आणि व्यवस्थापनबरोबरच यंदा युरोप बाजारपेठेत डाळिंब पाठवण्यात मार्गदर्शक व कृषिभूषण अंकुश पडवळे आणि अमरजित जगताप यांचे वेळोवेळी केलेले मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. 
- सागर शेळके, युवा शेतकरी, कटफळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com