Khanapur : शेतात पाणी सोडण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना वाहनाची धडक; अपघातात तिघांचा मृत्यू

गोधोळीचे 4 शेतकरी (Farmer) त्यांच्या शेतात उसाला पाणी देण्यासाठी जात होते.
Accident Dharwad Ramnagar Highway
Accident Dharwad Ramnagar Highwayesakal
Summary

नंदगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला आहे.

बेळगाव-खानापूर : गोधोळी गावाच्या हद्दीत धारवाड-रामनगर महामार्गावर (Dharwad-Ramnagar Road Accident) शेतात जाणाऱ्या चार शेतकऱ्यांना अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिल्यानं 2 शेतकरी जागीच ठार, तर एकाचा केएलईत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.

गोधोळीचे 4 शेतकरी (Farmer) त्यांच्या शेतात उसाला पाणी देण्यासाठी जात होते. गावाच्या शिवारात पायी चालत शेताकडं जात असताना मागून आलेल्या अज्ञात वाहनानं त्यांना धडक दिल्यानं दोघांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी एकाचा बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला, तर दुसरा किरकोळ जखमी झाला.

Accident Dharwad Ramnagar Highway
TMC Leader : 'मी पुरुष आहे, पण..'; समलिंगी विवाहाच्या समर्थनार्थ ममता बॅनर्जींच्या पुतण्याचं मोठं वक्तव्य

महाबळेश्वर शिंदे (वय 65), गोधोली गावातील पुंडलीक रेडेकर (वय 72) आणि पुंडलिकचा मोठा भाऊ कृष्णा रेडेकर (74) अशी अपघातातील मृतांची नावं आहेत. त्यांच्यावर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. अन्य जखमी मंजुनाथ कागीनाक (47) यांना किरकोळ दुखापत झाल्याने ते बचावले. नंदगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला आहे.

Accident Dharwad Ramnagar Highway
VIDEO : तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेल्या 'या' बड्या मंत्र्याला थेट मोदींचा फोन; नाराजी झाली दूर?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com