कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी; आता अशी मिळणार विमानसेवा

Kolhapur Belgaum Airplane Started
Kolhapur Belgaum Airplane Started
Updated on


उजळाईवाडी (कोल्हापूर) ः प्रवाशांच्या सर्वोत्तम प्रतिसादामुळे ट्रु जेट विमान कंपनी आता कोल्हापूरकरांसाठी विमान सेवेचे जाळे विस्तारित असून त्यामुळे कोल्हापूरकरांना आता मुंबई सोबतच बेळगाव -तिरुपती, हैदराबाद, म्हैसूर कालिकत, कोचीन या शहरांना शनिवार (ता. 11)पासून सेवा सुरू होत आहेत.
परंतु, विमान मार्गाची पुनर आखणी करण्यासाठी येत्या शनिवारपर्यंत तांत्रिक कारणास्तव मुंबई विमानसेवा बंद राहणार आहे.

हे पण वाचा - गुड न्यूज...  `या` बॅंकेच्या लिलावास स्थगिती...

प्रवाशांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे कोल्हापूर विमानतळावर सेवा देणाऱ्या सर्वच विमान कंपन्यांना कोल्हापुरातील विमान सेवेबाबत आत्मविश्वास दुणावला असून त्यामुळे भारतातील प्रमुख शहरांना सेवा पुरवण्यासाठी विमान कंपन्या उत्सुक आहेत.

ट्रू-जेटचे विमान सकाळी साडेसात वाजता तिरुपतीवरून सुटेल व सकाळी सव्वानऊ वाजता बेळगाव येथे पोहोचेल. बेळगाव येथून सकाळी 9.35 वाजता टेक ऑफ होईल व म्हैसूर येथे 11 वाजता लॅंडिंग होईल. परत म्हैसूरहून दुपारी 11.20 वाजता रवाना होइल व बेळगाव येथे दुपारी पावणे एक वाजता आगमन. बेळगावहून दुपारी 1. 05 मिनिटांनी टेक ऑफ, कोल्हापूर येथे दुपारी 1. 35 वाजता लॅंडिंग. कोल्हापूर येथून दुपारी पापणे 1.55 वाजता मुंबईला रवाना. मुंबई येथे दुपारी पावणे तीन वाजता लॅंडिंग. मुंबईवरून दुपारी 3.5 ला टेक ऑफ. कोल्हापूर येथे सायंकाळी 5 वाजता अगमन. कोल्हापूरहून सायंकाळी सव्वा पाच वाजता टेक ऑफ, बेळगाव येथे सायंकाळी पाव सहा वाजता लॅंडिंग होणार आहे. सायंकाळी 6. 5 मिनिटांनी बेळगाव येथून सुटणार व तिरुपती येथे 7.55 ला पोहोचणार तसेच हैदराबादवरून सायंकाळी 5.50 वाजता विमान बेळगावला येणार असून सायंकाळी 7. 25 ला लॅंडिंगण होईल. बेळगाव येथून रात्री पावणे आठ वाजता विमान टेक ऑफ घेणार असून रात्री 9.10 ला हैदराबाद येथे लॅंडिंग होणार आहे.

हे पण वाचा -  कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास थोरात का आहेत अनुत्सुक? 

शनिवारपर्यंत कोल्हापूर मुंबई विमानसेवा खंडीत होणार आहे
विमान मार्गाच्या पुनर आखणीमुळे शनिवारपर्यंत कोल्हापूर मुंबई विमानसेवा खंडीत होणार असून त्यानंतर मुंबईसाठी नियमित विमानसेवा सुरू राहील.
कमल कटारिया, संचालक, कोल्हापूर विमानतळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

What is the Sangli rainfall record scam?
Sangli farmer gold chain recovery
wild dog population in Sahyadri Tiger Reserve
Why was the man killed for insurance money?
Marathi News Esakal
www.esakal.com