
शिवाजी यादव
कोल्हापूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण विभागाने एमबीबीएस ते एमडी, एमएसच्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय सुविधा दिली आहे. यात यंदासाठी दोन हजार पुस्तकांची मागणी केली आहे. यातून जवळपास दोन कोटींची पुस्तक खरेदी होणार आहे. यातून वैद्यकीय संशोधन व नवीन उपचार तंत्राविषयी अद्ययावत ज्ञान विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.