esakal | कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला; 39 बंधारे पाण्याखाली
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला; 39 बंधारे पाण्याखाली

कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला; 39 बंधारे पाण्याखाली

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : भारतीय हवामान खात्याने (MID) येत्या पाच दिवस राज्यात अतिवृष्टीचा इशारा (heavy rain) दिला आहे. यानुसार कोकण, (konkan) पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरु असून पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. आज सायंकाळी ७ वाजता ही पाणीपातळी ३२ फुटांवर गेली आहे. (kolhapur rain update) जिल्ह्यातील एकुण ३९ बंधारे पाण्याखाली आहेत. याशिवाय धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक आहे. चंदगड, आजरा, कोवाड या भागात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे परिसरातील नद्यांची पाणीपातळी वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील पावसाचा घेतलेला आढावा पुढीलप्रमाणे...

तुळशीत १०७ मिमी. पाऊस

धामोड : तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज दिवसभर अतिवृष्टी झाली . येथे १०७ मि.मी. पावसाची नोंद झाली. सात तासात ७२ मि.मी. पाऊस झाला. तुळशी धरणाच्या क्षेत्रात आज अखेर १४९३ मि.मी. पाऊस झाला आहे. सध्या तुळशी धरणाची पाणी पातळी ६०८. ३५मी. आहे. दरम्यान केळोशी बुद्रुक येथील लोंढा नाला प्रकल्पातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे तुळशी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. खामकरवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग तुळशी नदीपात्रात जात असल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे.

हेही वाचा: भाजपा आमदारावर गुन्हा दाखल; बंदी आदेशाचे केले उल्लंघन

चंदगडमध्ये जोर वाढला

चंदगड : तालुक्यात आज दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहीला. मुसळधार पावसामुळे घटप्रभा व ताम्रपर्णी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. माळरानावरील रखडलेल्या भाताच्या रोप लावणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. दरम्यान मुसळधार पाऊस आणि जोराचा वारा यामुळे कानूर बुद्रूक येथील कृष्णा गोविंद गावडे व धोंडीबा शिवराम गावडे यांच्या घरावर झाड कोसळून अनुक्रमे ४० हजार व एक लाख रुपयांचे नुकसान झाले. मारुती आप्पा नाईक यांच्या घराची भिंत पडून २० हजाराचे नुकसान झाले. मंडलनिहाय आज आठपर्यंत २४ तासांत झालेला पाऊस असा : चंदगड ४८, नागणवाडी ३८, माणगाव १५, कोवाड २२, तुर्केवाडी २५, हेरे ५५.

कोवाड परिसरात जनजीवन विस्कळित

कोवाड ः जोरदार गार हवा आणि कोसळधर यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. ताम्रपर्णीच्या पातळीत कमालीची वाढ झाली. हवेत गारवा असल्याने घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी होती. दुपारी पावसाचा जोर कमी होता पण त्यानंतर पुन्हा जोरदार पावसाला सुरवात झाली. भात लागणीव्यतिरित शेतातील इतर कामे बंद होती. सुट्टीचा दिवस असला तरी कोवाड बाजारपेठेत पावसामुळे गर्दी नव्हती. पावसाची मोठी सर आली की ओढ्यांचे पाणी रस्त्यांवर येत होते.

घटप्रभेच्या पातळीत वाढ

नेसरी ः नेसरी परिसरात संततधार वाढल्यांने घटप्रभा नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. घटप्रभा नदी तुडुंब भरली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदी पात्राबाहेर येण्याची शक्यता आहे. नदी काठावरील शेतीची कामे उरकून घेण्याबरोबरच काठावरील विद्युत मोटरी, इंजिन काढण्यासाठी शेतकरी वर्ग गुंतला आहे.

हेही वाचा: राज्यात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा; 'या' जिल्ह्यांत मुसळधार

भोगावती पात्राबाहेर

राशिवडे बुद्रुक : राधानगरी तालुक्यात पावसाने धुव्वाधार सुरुवात केली आहे. आज सबंध तालुक्यातधुमाकूळ घातला. भोगावती नदीचे पाणी आज पात्राबाहेर पसरले आहे. राधानगरी धरण क्षेत्रावर आज सकाळच्या २४ तासांत १३० मिमी. पाऊस झाला. दिवसभरात दहा तासांत तब्बल ६९ मिमी. पाऊस झाला आहे. राधानगरी, काळम्मावाडी व तुळशी धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने तिन्ही धरणांची पातळी झपाट्याने वाढू लागली आहे. राधानगरी धरणात आज ६० टक्के साठा झालापावसाचा जोर वाढतच आहे. वीजनिर्मितीसाठी राधानगरी धरणातून विसर्ग वाढवल्याने भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे.

बाजारपेठेत शुकशुकाट

कोडोली : संततधार पावसामुळे नागरिक बाहेर न पडल्याने बाजारपेठ शांत होती. दिवसभर पाऊसाची भुरभूर होती तर आज पहाटे पासूनच अंधारून येऊन संततधार पाऊस पडू लागल्याने पाऊस जिरवणी योग्य असल्याने जमिनीतील पातळी वाढण्यायोग्य असल्याने शेतकरी सुखावला.

वेदगंगा नदीवरील बंधारे पाण्याखाली

म्हाकवे : पावसाने वेदगगंगा नदीवरील नानीबाई चिखली, बस्तवडे, कुरणी, सुरूपली बंधारे पाण्याखाली गेले. परिणामी परिसरातील दहापेक्षा अधिक गावांसाठी वाहतूक कोंडी झाली. बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक कागल तालुका सार्वजनिक बांधकाम विभागाने अन्य मार्गाने वळवल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता डी. व्ही. शिंदे यांनी दिली. नदीकाठचे हजारो हेक्टर क्षेत्रावरील भात, ऊस पिके पाण्याखाली आहेत. पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर असल्याने वेदगगंगा नदीचा पूर आला आहे. परिणामी कुरणी, सुरूपली बंधारा पाण्याखाली असल्याने मुरगूड शहराकडे जाणेसाठी पिंपळगाव, चौंडाळ, मळगे खुर्द,मळगे बुद्रुक, भडगाव कुरणी, गावातील प्रवाशांना निढोरी मार्गे जावे लागत आहे.

हेही वाचा: मुसळधारेमुळे पंचगंगा पात्राबाहेर; गावांना सतर्कतेचा इशारा

आजऱ्यात पावसाचा जोर वाढला

आजरा ः आजरा तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पाऊस कोसळत आहे. शेतवडीमध्ये पाणीच पाणी झाल्याने भात रोपलावणीच्या वेग आला आहे. आज दिवसभरात तालुक्यात जोरदार पाऊस झाला. हिरण्यकेशी व चित्रा नदी पात्रालगत वहात आहेत. आेढे व नाल्याना पाणी आले आहे. पावसा अभावी पश्चिम भागातील रोपलावणीची कामे ठप्प होती. शेतकऱ्यांनी विहीरी व नदीच्या पाण्यावर रोप लावण चालू ठेवली होती. पावसाने दमदार सुरवात केल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

चिकोत्रा धरणात ६० टक्के साठा

पिंपळगाव ः भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव परिसरात आज दिवसभर मुसळधार पाऊस झाला.गेल्या चोवीस तासात चिकोत्रा धरणक्षेत्रात ९० मिमी. पावसाची नोंद झाली आहे. चिकोत्रा धरण ६०.७७% भरले आहे. धरण परिसरात सतत पाऊस सुरु आहे.मोठ्या पावसामुळे शेतातील बांध फुटून काही ठिकाणी नुकसान झाले आहे मुरुक्टे ता.भुदरगड अरण्यक्षेत्रात अस्ट्रोलिअयन बाबूळची झाडे उन्मळली आहेत.

loading image