कोल्हापूरात आयटीआयचे ५०० विद्यार्थी गैरहजर

एसटी बंदचा फटका; खासगी वाहनांच्या प्रवासामुळे आर्थिक भुर्दंड
ST employee
ST employeesakal
Updated on
Summary

एसटी बंदचा फटका; खासगी वाहनांच्या प्रवासामुळे आर्थिक भुर्दंड

कळंबा : राज्य शासनाने एसटीचे विलीनीकरण(msrtc) करावे, यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी(st workers) दोन महिने संप पुकारला आहे. परिणामी एसटीची सेवा बंद झाली. त्यामुळे आयटीआयचे पाचशे विद्यार्थी गैरहजर(iti students) राहिले आहेत. कोरोनामुळे(corona) दीड वर्ष या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यानंतर आता एसटी बंदचा फटका या विद्यार्थ्यांना बसला आहे. दरम्यान, येथील अनेक विद्यार्थी खासगी प्रवासी वाहनाद्वारे प्रवास करत असून, एसटी तिकिटाच्या दीडपट जादा भाडे देऊन आयटीआयमध्ये प्रशिक्षणासाठी येतात. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. दरम्यान, चार दिवसांपासून तुरळक प्रमाणात एसटी सेवा सुरू झाली आहे.

ST employee
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक, खासगी उमेदवाराची फ्रिस्टाईल हाणामारी

कळंबा रोडवरील महाराष्ट्र शासन संचालित औद्योगिक व्यवसाय व प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत गारगोटी, राधानगरी, हातकणंगले, शिरोळ, कागल, शाहूवाडी, पन्हाळा यासह जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधून सुमारे २१०० विद्यार्थी व विद्यार्थिनी विविध प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण घेतात. त्यांना येथे इलेक्ट्रिशन, मशिनिस्ट, ड्रॉप्समन, मेकॅनिकल, सिव्हिल, जनरल पेंटर, मोटार मेकॅनिकल, वेल्डर, फिटर, मुलांचे हेअर अॅड स्किन केअर, कटिंग आदी प्रशिक्षण दिले जाते. बहुतांश विद्यार्थी संस्थेत प्रशिक्षण घेण्यासाठी पासद्वारे एसटीमधून प्रवास करत असल्याचे चित्र आहे, मात्र दोन महिने एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारल्यामुळे एसटीची सेवा बंद झाली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना प्रवासासाठी कसरत करावी लागत आहे.

ST employee
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात कुटुंबियांचा आत्मदहनाचा प्रयत्न 

औद्योगिक प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढला

आयटीआयमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यावर आधारित शिक्षण दिले जाते. विविध व्यवसायांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगारनिर्मिती व नामवंत कंपनीत नोकरीच्या संधी त्यांना उपलब्ध होत आहेत. त्यात येथील शिक्षकांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे येथील संस्थेत हे प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे चित्र आहे.

ST employee
येरवडा कारागृह कर्मचाऱ्यांत फ्रिस्टाईल हाणामारी

एसटी बंदमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. तसेच अनेक विद्यार्थी खासगी प्रवासी वाहनांतून प्रवास करत असून, जादा दराने त्यांच्याकडून भाडे आकारले जाते. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.

-प्राचार्य प्रकाश मुंडासे, आयटीआय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satej Patil on Gokul election politics
Kolhapur Crackdown: Former Corporator Booked After Raid on Video Parlour
Ichalkaranji on Edge After Alleged Abuse Case Involving Minor Girls; Police Tighten Security
Rohini Devaba World Wrestling Championship
Marathi News Esakal
www.esakal.com