
कोल्हापुरात तरूणाने घेतला गळफास
esakal
मुख्य मुद्दे (Highlights)
२७ वर्षीय इंद्रजित यादवने दुधाळीतील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीत आर्थिक विवंचना कारणीभूत असल्याचे नमूद.
हातउसणे घेतलेल्या पैशांचा ताण सहन न झाल्याने टोकाचे पाऊल; पोलिस तपास सुरू.
Kolhapur Boy Financial Stress : आर्थिक विवंचनेत सापडलेल्या इंद्रजित विक्रम यादव (वय २७, रा. मिणचे, ता. हातकणंगले) याने दुधाळी परिसरातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. नातेवाइकांनी गळफास सोडवून बेशुद्धावस्थेत त्याला सीपीआरमध्ये आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीत तो आर्थिक कारणाने चिंतेत होता, त्यातूनच हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले.