

कोल्हापुरात डॉक्टर मुलीने स्वतःच्या ७८ वर्षीय वडिलांना चावून बोट तोडल्याची व छातीवर लाथा मारल्याची घटना समोर.
esakal
Shocking Incident In Kolhapur : व्यवसायाने डॉक्टर असलेल्या मुलीने आपल्याच वडिलांच्या बोटाचा चावा घेऊन बोट तोडून बाजूला केल्याची घटना गिजवणे गावच्या हद्दीत घडली. यामध्ये गणपतराव विष्णू हाळवणकर (वय ७८, रा. केदार कॉलनी गिजवणे, ता. गडहिंग्लज) जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुलगी डॉ. शुभांगी सुनील निकम (४३, रा. बेळगुंदी, ता. गडहिंग्लज) हिच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.