
गौतमी पाटील अपघात प्रकरणावरून रोहित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात वाद...
esakal
हायलाइट्स (Highlight Summary – 3 Points)
गौतमी पाटीलचा वाहन अपघात
पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनामुळे रिक्षा अपघात झाला.
राजकीय वादाचा उधाण
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डीसीपी संभाजी कदम यांना फोन करून गुन्हा त्वरित तपासण्याचे आदेश दिले.
प्रत्येक पक्षाची प्रतिक्रिया
चंद्रकांत पाटील यांनी रोहित पवारांना प्रतिक्रिया देत सांगितले की त्यांनी अपघातग्रस्त रिक्षावाल्याची काळजी घेतली आहे.
Chandrakant Patil Vs Rohit Pawar : लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या वाहनाचा पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील एका रिक्षाला अपघात झाला. या प्रकरणी पोलिसांनी गौतमी पाटीलला नोटीस बजावली. अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाल्याने गौतमी पाटीलला अटक करायचं की नाही यावर जोरदार चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन लावत गौतमी पाटीलला पकडायचं काय झालं. दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.