Kolhapur News :१७–१८ महिन्यांचा आडसाली उस वेळेवर न तुटल्याने उत्पादनात मोठी पडझड; कारखानदारांवर शेतकरी संतप्त
Machine Harvesting Delay : मशीनद्वारे उसाची तोडणी प्राधान्याने सुरू असल्याने आडसाली उसाचा वेळीच गाळप न होण्याची भीती; वजन घट, खोडवा न उगवणे यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर.
शिरोळ : उसाची तोड मशीनद्वारे घेणार असल्यास तत्काळ ऊस तोडणी दिली जात आहे. साखर कारखानदारांच्या या धोरणामुळे ज्या शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लावला आहे. त्यांच्या ऊस तोडीस विलंब होत आहे.