कोरोनामुक्तीनंतर घ्या विश्रांती; बिनधास्त वावर ठरू शकतो धोकादायक

बाहेर पडल्यानंतर किमान पुढील सात दिवस संबंधित रुग्णाने घरी राहणे आवश्‍यक
कोरोनामुक्तीनंतर घ्या विश्रांती; बिनधास्त वावर ठरू शकतो धोकादायक

कोल्हापूर : कोविड सेंटरमधून (covid center) डिस्चार्ज मिळाल्यानंतर ‘मला काय हुतंय, आपण बरे झालो’ अशा मानसिकतेतून काही कोविड रग्णांचा बिनधास्तपणे वावर त्याच रुग्णासाठी धोकादायक परिस्थिती निर्माण करू शकतो, असे चित्र निर्माण झाले आहे. बाजारात काही ना काही तरी आणायच्या निमित्ताने हे रग्ण बाहेर पडतात. कोविड सेंटरमध्ये रुग्ण (covid-19 patients) दाखल झाल्यानंतर त्याच्या प्रकृतीच्या सुधारणेनुसार त्यांना घरी सोडले जाते. बाहेर पडल्यानंतर किमान पुढील सात दिवस संबंधित रुग्णाने घरी राहणे आवश्‍यक असते. घरी गेल्यानंतर त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारेही कोणी नाही. गृह अलगीकरण (home isolated) नियमाचे उल्लंघन केले जाते. संबंधित रुग्णावर औषधोपचार झाले तरी पुढे काही दिवस काळजी घेणे आवश्‍यक असते.

आपल्या संपर्कात कोणी येणार नाही; तसेच आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्‍यक होते. गेल्या लॉकडाउनमध्ये (lockdown)क्वारंटाईन (quarantine)सेंटरमधून घरी परतल्यानंतर संबंधिताच्या दरवाज्यावर क्वारंटाईन फलक लावला जात होता. प्रभाग समितीचे सचिव प्रभावी काम करत होते. आता या समितीचे अस्तित्व आहे, की नाही अशी परिस्थिती आहे. शहरात दररोज किमान चारशे नव्या रुग्णांची भर पडत आहे. कोविड सेंटरमध्ये दाखल झाल्यानंतर किमान दहा ते पंधरा दिवस उपचार केले जातात. डिस्चार्ज घेतल्यानंतरही ही धाप कमी होत नाही. अशा स्थितीत डॉक्टरांनी दिलेल्या सल्यानुसार पथ्यपाणी सांभाळणे आवश्यक असते.

कोरोनामुक्तीनंतर घ्या विश्रांती; बिनधास्त वावर ठरू शकतो धोकादायक
निसर्गाची लहर; एकाच वेळी चक्क 33 ब्रम्हकमळांचा बहर

शहरात कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. कमाल २३६ ते किमान ९८ हॉटस्पॉट ठरलेल्या वॉर्डमधील रुग्‍णांची संख्या आहे. याच प्रभागात सक्रिय रुग्णांची संख्या किमान बाराशेच्या वर आहे. दहा वॉर्ड सोडून अन्य ७१ वॉर्डमध्ये कोरोना रुग्‍णांची थोड्याफार प्रमाणात सक्रिय रुग्ण आहेत.

"कोविडच्या प्रॉटोकॉलप्रमाणे संबंधित रुग्णाला डिस्चार्ज दिला जातो, नंतर त्याने सात दिवस घरी थांबणे आवश्‍यक आहे. कोविडनंतर पोस्ट कोविडसह अन्य काही गुंतागुंत निर्माण होऊ शकतात. त्यामुळे विश्रांती घेणे आवश्‍यक आहे."

- डॉ. अशोक पोळ, आरोग्याधिकारी

कोरोनामुक्तीनंतर घ्या विश्रांती; बिनधास्त वावर ठरू शकतो धोकादायक
Video: लाइव्ह कार्यक्रमात महिलेने खासदाराला लगावली श्रीमुखात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com