खरीप हंगामावरील संकट दूर; DAP पाठोपाठ IFFCO ची खत दरवाढ मागे

कंपनीच्या निर्णयाने खरीप हंगातील खत दरवाढीचे संकट टळले
खरीप हंगामावरील संकट दूर; DAP पाठोपाठ IFFCO ची खत दरवाढ मागे

कोल्हापूर : ऐन खरीप हंगामात खताच्या दरात मोठी वाढ केल्यानंतर राज्यभर उसळलेल्या शेतकऱ्यांच्या रोषाची दखल घेऊन डीएपी (DAP fertilizer) पाठोपाठ केंद्र शासन (central government) अंगीकृत्त कंपनी असलेल्या इफ्को (IFFCO) कंपनीनेही आपली दरवाढ आज मागे घेतली. या कंपनीच्या निर्णयाने खरीप हंगातील खत दरवाढीचे संकट टळले आहे.

रासायनिक खतांच्या दरात केंद्र सरकारने १ एप्रिलपासूनच वाढ केली होती. पण त्याच दरम्यान असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुका (election of five state) आणि दरवाढी विरोधात या निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा रोष नको म्हणून ही दरवाढ मागे घेण्यात आली. निवडणुकांचा निकाल लागताच केंद्र सरकारने मे महिन्यात पुन्‍हा दरवाढ लागू केली.

खरीप हंगामावरील संकट दूर; DAP पाठोपाठ IFFCO ची खत दरवाढ मागे
'पुढच्या 10 वर्षांत आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करता येणार नाही'

ऐन खरीपाच्या तोंडावर कोरोनाचा प्रादुर्भाव (covid-19) रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन (lockdown) आणि त्यातच जाहीर झालेल्या खत दरवाढीमुळे राज्यभर शेतकऱ्यांत असंतोष पसरला होता. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारनेही यावरून केंद्र सरकावर टीकेची झोड उठवली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी (raju shetti) यांनी तर याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्यासह भाजपाच्या इतर नेत्यांनी ही दरवाढ मागे घेण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. या सर्वांचा परिणाम म्हणून बुधवारी (१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM modi) डीएपी खतांची दरवाढ तत्काळ मागे घेतल्याची घोषणा केली. पण इफ्को कंपनीच्या खतांची किंमत तशीच होती.

सर्वसाधारणपणे ५० किलोच्या पोत्यामागे ५०० ते ७०० रूपयांची दरवाढ करण्यात आली होती. आज इफ्कोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक झाली, त्यात खतांच्या किंमती पुर्ववत ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयाप्रमाणेच खत विक्रेत्यांनी जुन्या दरानेच खताची विक्री करण्याची सुचना कंपनीने दिली आहे.

खरीप हंगामावरील संकट दूर; DAP पाठोपाठ IFFCO ची खत दरवाढ मागे
विराटला अनुष्काचा आवडलेला चित्रपट माहितीये?

इफ्को खतांच्या किंमती (दर प्रती ५० किलो)

एनपीके १०-२६-२६- ११७५ रूपये

एनपीके १२-३२-१६ - ११८५ रूपये

एनीएस २०-२०-०-१३- ९७५ रूपये

व्यापाऱ्यांचा भ्रमनिरास

खतांच्या किंमती वाढण्यापुर्वी जिल्ह्यात सर्व खतांचा मिळून सुमारे २२ हजार टन साठा होता. दर वाढीनंतर जुन्या दरातील खतांची विक्री नव्या दराने करण्याचे प्रयत्न सुरू होते, त्यासाठी नव्या दरांचे लेबल बसवून ते बाजारात आण्यण्याचा प्रयत्न सुरू होते, त्यासाठी कृत्रिम टंचाईही भासवण्यात येत होती.पण आज डीएपी पाठोपाठ इफ्को कंपनीनेही खतांची दरवाढ मागे घेतल्याने साठेबाजीतून नफा मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यापाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

खरीप हंगामावरील संकट दूर; DAP पाठोपाठ IFFCO ची खत दरवाढ मागे
'चिवला बीचवर मुख्यमंत्री राणेंचे घर पहायला आले होते का?'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com