
आंबा घाट
esakal
ठळक मुद्दे (Highlights)
साडेतीन किमी बोगद्याला मंजुरी – आंबा घाटातील वाहतूक सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) साडेतीन किलोमीटर लांबीच्या बोगद्याला हिरवा कंदील दाखवला.
वाहतूक व सुरक्षिततेसाठी मोठा लाभ – या बोगद्यामुळे अपघातांची शक्यता कमी होणार असून, घाटातील अवघड वळणांवरून जाण्याचा त्रास टळणार आहे.
पर्यटन व व्यापाराला गती – या प्रकल्पामुळे कोल्हापूर, रत्नागिरी आणि कोकणातील पर्यटन तसेच व्यापार वाहतुकीला नवी चालना मिळणार आहे.
Amba Ghat Road Connectivity : रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटातील धोकादायक वळणे काढण्यासाठी साडेतीन किलोमीटरचा बोगदा खोदण्यात येणार आहे. या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. खासगी ठेकेदारामार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.