Kolhapur : अंबाबाई मंदिरातील धार्मिक अनुष्ठानाची सांगता; पंचगंगा घाटावर अवभृत स्नानाचा सोहळा, भाविकांची मोठी गर्दी

सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांनी पंचगंगा घाटावर केली होती मोठी गर्दी
Ambabai Temple Panchganga Ghat
Ambabai Temple Panchganga Ghatesakal
Summary

देवीच्या उत्सवमूर्तीवर अवभृत स्नानाचा सोहळा सजला. त्यानंतर देवीचा नौकाविहारही झाला.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात (Ambabai Temple) अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या धार्मिक अनुष्ठानाची नुकतीच सांगता झाली. तत्पूर्वी, सकाळी देवीची पालखी पंचगंगा घाटावर (Panchganga Ghat) आली.

Ambabai Temple Panchganga Ghat
हृदय पिळवटून टाकणारी घटना! आजी, आजोबासह नातीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; घरात एकमेकांना चिकटून पडले होते मृतदेह

येथे देवीच्या उत्सवमूर्तीवर अवभृत स्नानाचा सोहळा सजला. त्यानंतर देवीचा नौकाविहारही झाला. दरम्यान, हा सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांनी पंचगंगा घाटावर मोठी गर्दी केली. करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळातर्फे गेली तीन दिवस मंदिरात धार्मिक अनुष्ठान झाले.

अधिक मासात सर्वत्र शांतता, सलोखा, आरोग्य आणि सुबत्तेसाठीची प्रार्थना म्हणून हे अनुष्ठान केले जाते. त्याची सांगता उत्सवमूर्ती व यजमान पुरोहितांच्या अवभृत स्नानाने झाली. सकाळी साडेदहाच्या सुमारास तोफेची सलामी दिल्यानंतर श्री अंबाबाईची पालखी महाद्वार चौकातून महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेस या मार्गावरून पंचगंगा घाटावर आली.

Ambabai Temple Panchganga Ghat
Jyotiba Yatra 2023 : जोतिबा डोंगरावर यात्रेची जय्यत तयारी, कधी आहे यात्रा? यंदा उच्चांकी गर्दीची शक्यता

येथे स्नानाचा सोहळा व विविध धार्मिक विधी झाल्यानंतर पुन्हा पालखी गंगावेश, गुजरीमार्गे मंदिरात आली. त्यानंतर पूर्णाहुती होऊन अनुष्ठानाची सांगता झाली, असे श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनीश्वर, मयूर मुनीश्वर यांनी सांगितले.

Ambabai Temple Panchganga Ghat
Prithviraj Chavan : नवाब मलिकांवर दबाव, जामिनामागं मोठं राजकारण; माजी मुख्यमंत्र्यांच्या मनात वेगळाच संशय

दरम्यान, अनुष्ठानासाठी दर्शनरांगेत किरकोळ बदल करण्यात आला होता. दुपारनंतर दर्शन रांग पूर्ववत करण्यात आली. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या संकेतस्थळ आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या सोहळ्याचे प्रसारण झाल्याने जगभरातील भाविकांना तो घरबसल्या अनुभवता आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com