मशिन ऊस तोडीतून  शेतकऱ्यांची ३५ कोटींची लूट

Andolan Ankush and Jayashivrai organization  Warning of intense agitation
Andolan Ankush and Jayashivrai organization Warning of intense agitation

कोल्हापूर :  यंदाच्या हंगामात मशिन तोड उसास पाच टक्के मोळी बांधणी वजावटमध्ये  जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तब्बल ३५ कोटींची फसवणूक होत असल्याचा आरोप आंदोलन अंकुशने प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिलेल्या निवेदनात केला आहे. 
दरम्यान, याबाबत सोमवार (ता. ४) प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात झालेल्या कारखाना प्रतिनिधींच्या बैठकीत ही वजावट पाचऐवजी एक टक्का करण्याचे आदेश ए. व्ही. निकम यांनी दिले. २६ जानेवारीपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलन अंकुश व जयशिवराय संघटनेने दिला आहे. 

यावर्षी ऊसतोडणीसाठी मजुरांची टंचाई होणार म्हणून जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी ऊस तोडीसाठी मोठ्या प्रमाणात ऊसतोड यंत्राची उपलब्धता केली आहे. मशिन तोड उसास कारखाने मोळीबांधणी वजावट म्हणून पाच टक्‍के वजनात कपात करत आहेत. यंत्राद्वारे होणारी तोड व त्याचे पाच टक्‍क्‍यांप्रमाणे कपातीची रक्कम काढल्यास ती ३५ कोटींच्या 
घरात आहे. 

या कारखान्यांकडून एक टक्का कपात
जिल्ह्यातील दत्त-शिरोळ, शाहू-कागल व मंडलिक-हमिदवाडा या  कारखान्यांनी पाचऐवजी एक टक्का कपात मशिनद्वारे तोडण्यात येणाऱ्या उसाची सुरू केली आहे. सांगली जिल्ह्यातील ११ कारखाने ३६ मशिनद्वारे ऊसतोड करत आहेत, या जिल्ह्यातसुद्धा जवळपास ८ कोटी ४६ लाख रुपयांची शेतकऱ्यांची लूट होणार आहे.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com