

kolhapur bribery case latest news
esakal
ACB Raid In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील मूरगुड येथील नगरपरिषदेच्या स्थापत्य विभागाचा नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई (वय ३२, रा. मिणचे खुर्द, ता.भुदरगड) याला ४० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले. घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे.