...म्हणून झाला एस बॅंकेत गोंधळ

argument in yes bank kolhapur
argument in yes bank kolhapur

कोल्हापूर : रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध घातलेल्या एस बॅंकेच्या कोल्हापुरातील शाखेत सकाळी ग्राहक व ठेवीदारांनी गोंधळ घातला. या बॅंकेचे बहुंताशी एटीएमही बंद राहीले तर इतर बॅंकांच्या एटीएममधूनही या बॅंकेतील खात्यावरील पैसे न मिळाल्याने गोंधळात अधिकच भर पडली. दरम्यान, या बॅंकेतून पगार होणाऱ्या अनेक संस्थांचे पगार अडकून पडल्याने त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले.

आर्थिक तरलता न सांभाळल्याने काल (ता. 5) रिझर्व्ह बॅंकेने एस बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्तीची कारवाई केली. त्यानंतर बॅंकेच्या अर्थिक व्यवहारावरही तातडीने निर्बंध आणण्यात आले. सायंकाळी सहा वाजता झालेल्या या कारवाईची माहिती बहुंताशी ग्राहकांना आज सकाळी मिळाली. खात्यातून केवळ 50 हजार रूपयांची रक्कम काढता येणार असली तरी योग्य त्या कारणासाठी मिळणार असल्याने बॅंकेचे व्यवहार आजपासूनच ठप्प झाले. परिणामी त्याचा मोठा फटका ग्राहकांना बसला. 


कोल्हापुरात ताराराणी चौक व लक्ष्मीपुरी अशा दोन ठिकाणी एस बॅंकेच्या शाखा आहेत तर काही ठिकाणी या बॅंकेची एटीएएम सेंटर आहेत. बॅंकेवरील निर्बंधाची माहिती मिळताच ग्राहकांनी या दोन्हीही शाखेत गर्दी केली. आमचे खात्यावरील पैसे कधी मिळणार म्हणून काही ग्राहकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. या दोन्हीही शाखांत पोलीस बंदोबस्त होता, पण त्याला न जुमानता ग्राहकांनी बॅंकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. दिवसभर या दोन्हीही शाखेत ग्राहकांची दिवसभर गर्दी होती. 

आज दिवसभर बॅंकेत शिल्लक असलेली खातेदारांची रक्कम त्यांच्या मागणीनुसार देण्यात आली. पन्नास हजारापर्यंतच रक्कम देण्याचे आदेश रिझर्व्ह बॅंकेने दिल्याने त्यापेक्षा कमी असलेली रक्कम काढण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. उद्याही (ता. 7) उर्वरित ग्राहकांना त्यांच्या खात्यावर असलेल्या रक्कमेपैकी पन्नास हजारापर्यंतची रक्कम देण्यात येणार आहे. 3 एप्रिलपर्यंत बॅंकेवर निर्बंध रहाणार आहेत. दरम्यानच्या काळात बॅंकेची अर्थिक तरलता सुधारल्यास हे निर्बंध शिथिल करण्यात येतील. 

जिल्ह्यातील तिसरी बॅंक 
यापुर्वी जिल्ह्यातील युथ डेव्हलपमेंट व पीएमसी बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने अर्थिक निर्बंध आणले आहेत. आता एस बॅंकेच्या रूपाने तिसरी बॅंक या निर्बंधाखाली आली. युथ बॅंकेवर निर्बंध येऊन वर्षाचा कालावधी लोटला तरी हे निर्बंध कायम आहेत. शहरात पीएमसी बॅंकेच्याही अनेक शाखा आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com