esakal | बेळगाव: गणपतीचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगाव: गणपतीचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

बेळगाव: गणपतीचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

sakal_logo
By
सतीश जाधव

बेळगाव: बेळगाव शहरातील घरगुती गणेशोत्सव आणि देखावे यांचे अतुट नाते आहे. यामुळे शहरातील अनेक घरात आपल्याला घरगुती देखावा पाहायला मिळतो. शहरासह ग्रामीण भागातही बहुतांशी घरात गणेशोत्सवाच्या कालावधीत हालते देखावे करण्याची परंपरा आहे. यंदाही अनेकांनी आपल्या घरातील गणपती बाप्पांसमोर हालते देखावे साकारले आहेत. हे आकर्षक देखावे पाहण्यासाठीही गर्दी होत आहे.

हेही वाचा: शाहू साखर कारखाना भरवणार कुस्ती स्पर्धा

वडगाव रयत गल्लीत अनेक वर्षापासून प्रत्येक घरात देखावा साकारण्याची परंपरा आहे. यंदाही या ठिकाणी आकर्षक देखावे साकारण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या कालावधीत घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील देखावे पाहण्यासाठी महाराष्ट्रासह गोवा येथून देखील नागरीक येतात.

अनेक ठिकाणी सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यावर भर दिला जातो. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्‍नही या माध्यमातून मांडले जातात. घरगुती देखावे तयार करण्यासाठी अनेक दिवसांपासून तयारी केली जाते. यातील काही हलत्या देखाव्यांना खर्चही अधिक येतो. मात्र आपल्या आवडीसाठी तो खर्च त्यांच्याकडून केला जातो.

पाटील मळा येथील संजय पाटील व कुटुंबियांने यावर्षी दही हंडीचा देखावा साकारला आहे. तसेच आझाद गल्ली येथील मोहन बडमंजी शेतकऱ्यांवर आधारीत हालता देखावा साकारला आहे. शिवाजीनगर, मुतगा येथील रहिवासी विशाल पाटील यांनी आपल्या बाप्पासोबत गोवा येथील समुद्र किनारपट्टी दाखविली आहे.

त्यांना हा देखावा साकारण्यासाठी ४ दिवसांचा कालावधी लागला. हे पाहण्यासाठी त्यांच्याकडे गर्दी होत आहे. कुद्रेमानी येथील सुशांत शिंदे यांनी आपल्या घरात पंढरपुरच्या विठ्ठालाचा देखावा साकरला आहे. हा देखावा साकारण्यासाठी त्यांना तीन दिवसांचा कालावधी लागला आहे. दरवर्षी त्यांच्याकडून असे विविध देखावे साकारले जातात.

"मी गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचे हालते देखावे गणपती बाप्पांसमोर करतो. यंदाही दही हंडीचा देखावा केला आहे. देखावा पाहण्यासाठीही नागरीक येत आहेत. मला आवड असल्याने मी दरवर्षी देखावे करतो."-संजय पाटील, पाटील मळा

loading image
go to top