

BJP Corporator 23 Year Old Daughter Dies By endlife Before Exam Tragic Incident Sends Shockwaves Across The City
sakal
इचलकरंजी : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या येथील एका तरुणीने आज पहाटे घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी साडेसहाच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. हिंदवी म्हाळसाकांत कवडे (वय २३, रा. सुदर्शन चौक) असे तिचे नाव आहे. भाजप नगरसेविका शशिकला कवडे यांची ती मुलगी होती. आत्महत्या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.