esakal | एक्झॉटिक फळभाज्या :काळे वांगे, सांबर काकडी अन्‌ गुजराती चवळी...!
sakal

बोलून बातमी शोधा

एक्झॉटिक फळभाज्या : काळे वांगे, सांबर काकडी अन्‌ गुजराती चवळी...!

एक्झॉटिक फळभाज्या : काळे वांगे, सांबर काकडी अन्‌ गुजराती चवळी...!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: अन्य राज्यातून ही कोल्हापूर मंडईत काही पालेभाज्या, फळभाज्या विक्रीसाठी येतात. या फळभाज्यांचे उत्पादन कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत नाही. यामध्ये वांगी, काकड्यांच्या विविध प्रजातींचा समावेश आहे. जसे की, काळे वांगे (अघोर) हे संगमनेर (नाशिक) येथून येते; तर गुजरात, राजस्थानवरुन बेल वांग्यांची प्रजाती मिळते. शिवाय बंगाल प्रांतातील परवलं नावाची फळभाजीही येते.

हेही वाचा: सहकार मंत्र्यांच्या पुतणीचा काँग्रेस आमदार पीएन पाटील यांच्यासह मुलाकडून छळ

अघोर काळ्या वांग्याचे वैशिष्ट्य म्हणजे, झाड बऱ्यापैकी मोठे असते. एका झाडाला ३० वांगी मिळतात; तर एका वांग्याचे वजन हे ३०० ग्रॅमच्या वर असते. ही वांगी भरतासाठी वापरली जात असून चविला अतिशय उत्कृष्ठ असतात. सांबर काकडी (मग्गी) ही गुजरातवरुन येते. ही काकडी सॅलडसाठी वापरली जात असून खूप दिवस टिकते. या खास एक्झॉटिक भाज्या घेणारा वर्ग कोल्हापूरमध्ये खूप आहे.

विशेषत: डाएटिशन, बॉडि बिल्डर, डॉक्टर, ॲथलेटिक्स्‌, ब्युटिपार्लर्स आदी घटकांचा समावेश आहे. वेगळ्या भाज्या खाणारा वर्ग हा ‘कनेक्ट’ झालेला आहे. शाहुपूरीतील रेल्वेफाटकाजवळील मंडईत काही व्यापारी ही फळभाजी विक्री करतात. रोड ट्रान्स्पोर्ट किंव रेल्वे मार्गाने या भाज्या येतात.

एक्झॉटिक भाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपये) :

काळे वांगे अघोर (होलसेलचा १० किलो दर ४००/रिटेलचा दर ६० ते ८०), करटोली (१६०), सुरण गड्डा (८०), आरबी उर्फ अळूचे गड्डे (८०), सांबर काकडी उर्फ मग्गी (६०), इंदूरी गाजर (६०), बंगाली परवल (१००/१२०), ज्यूससाठी कवाळ (६०), गुजराती चवळी (१२०), लाल भोपळा (४०), घोसावळे (४०).

‘‘अशा वेगळ्या प्रकारच्या भाज्या मी विक्रीसाठी ठेवतो. अनेक लोक या भाज्या घेण्यासाठी येतात. एखादी भाजी नसेल तर लोक विचारुन जातात. ती भाजी आणा म्हणून सांगून जातात. भाज्यांचे दर जरी जास्त असले तरी चवीला या भाज्या उत्कृष्ठ आहेत.’’- चानसाब यरगट्टीकर, व्यापारी

सुके खोबऱ्यात दुप्पट वाढ

कोल्हापूर, ता. १२ : गणपती झाला की, दसरा अन्‌ दिवाळीचा उत्सव सुरु होता. याकरीता फराळासाठी सुक्या खोबऱ्याचा वापर खूप होता. म्हणून सुक्या खोबऱ्याच्या दरात वाढ होते. गेल्या पाच वर्षात सुक्या खोबऱ्याचे दर दुप्पट झाले आहेत. कोल्हापूरच्या बाजारपेठेत १० ते १६ टन सुके खोबरे येते. हे खोबरे कालिकतवरुन येते.

खरेतर राजारापुरी खोबरे म्हणजे, कालिकतवरुन येणारे खोबरे. भारतातील उत्पादन : केरळ, कर्नाटक इ. नारळ पिकविणाऱ्या मुख्य राज्यांत खोबऱ्याचे उत्पादन होते. केरळात तयार झालेल्या खोबऱ्याचा तेल मिळविण्यासाठी जास्त प्रमाणावर उपयोग होतो, तर कर्नाटकात तयार झालेले खोबरे खाण्यासाठी वापरतात.

आंध्र प्रदेश, तमिळनाडू, अंदमान व निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटे येथेही अल्प प्रमाणावर खोबऱ्याचे उत्पादन होते. केरळात २,३३,००० टन खोबऱ्याचे उत्पादन होते. तामीळनाडू, केरळातील अलेप्पी, कोचीन, कालिकत येथे खोबऱ्याचे उत्पादन अधिक होते.

राजापुरी खोबरे कसे?

राजापुरी खोबरे म्हणण्याचे कारण म्हणजे, ब्रिटीश कालखंडात रस्ते, वाहतूकीची व्यवस्था प्रबळ नव्हती. कालिकतवरुन येणारे खोबरे हे जहाज मार्गे राजापुरी बंदरावर येत असे. यानंतर ते अंतर्गत बाजारपेठेत पाठविण्यात येत असे. आता वाहतूकीच्या व्यवस्था असली तरी अजूनही कालिकत खोबऱ्याला राजापुरी खोबरे म्हणूनच ओळखले जाते. यामध्ये दुसरा फरक असा की, मद्रासी खोबरे (मल्टि खोबरे) हलक्या प्रतिचे मानले जाते; तर कालिकत खोबऱ्याची चव उत्कृष्ठ असते. त्यामुळे दरही प्रतिकिलो मागे जास्तच राहतात.

सुक्या खोबऱ्याचे दर (प्रतिकिलो रुपये)

-मल्टी सुके खोबरे (१८०)

-राजारापुरी सुके खोबरे (२४०)

‘‘नारळाचे उत्पादन जरी दक्षिण भारतात जास्त असले तरी मजुरांचा तुटवडा ही समस्या आहे. परिणामी, जितके नारळ उतरविले जातात, ते सर्व नारळ अंतर्गत बाजारपेठेत वितरीत होतात. तसेच नारळाचा सर्वाधिक वापर हा तेल गाळण्यासाठी होत असल्याने गोटा खोबरे (सुके खोबरे) तुलनेने कमी येते. परिणामी, वाहतूक, मजूरी आदीमुळे दर वाढतात.’’ - इशान मूग, (रामचंद्र तवनाप्पा मूग जनरल स्टोअर्स)

कोल्हापूर : लक्ष्मीपुरीसह शहरातील सर्व मंडईत हातगाडीवर पिवळ्याजर्द केळांचे घोस दिसत आहेत.

सीमला सफरचंदांची मोठी आवक

कोल्हापूर: श्रावण सोमवार सुरु झाला की, सर्वाधिक आवक सीमला सफरचंदांची सुरु होते. जितकी आवक वाढेल तितके दरही कमी होत जातात. हे सीमला सफरचंद डिसेंबर-जानेवारीपर्यंत कोल्हापूरच्या बाजारपेटेत राहते. सध्या डाळींब, सीताफळांची आवक खूप वाढली आहे. सीताफळांचे ढिग सर्वत्र दिसत आहेत. दरही कमी आहेत.

फळांचे दर (प्रतिकिलो रुपये) :

सिमला सफरचंद (६०/८०), सीताफळ (३०/४०), डाळींब (१०/२०/३०), देशी संत्री (५०), विदेशी संत्री (८०/१००), ड्रॅगन फ्रुट (५०/१००), किवी (५० रुपयाला तीन नग), नासपती (५०/१००), चिक्कू (३०/४०), सरदार लखनौ पेरु (८०), थायलंड पेरु (१००), जी-विलास पेरु (७०), देशी पेरु (४०/५०), राणी अननस (५० रुपये पेंडी), रातांबा (५० रुपये तीन नग).

बाजारपेठेतील प्रमुख दर असे :

- सोने : ४८,५००

- चांदी : ६६,०००

- साखर (क्विंटलचे दर) : ३,७५० ते ३८००

कोल्हापूर : रेल्वेफाटक येथील मंडईत गौरी-गणपतीच्या प्रसादासाठी मिक्स भाज्या घेण्यासाठी गर्दी झाली होती.

शेकेच्या पालेभाज्यांसाठी गर्दी

कोल्हापूर : गौरी पुजन होणार आहे, यासाठी शेकेच्या (मिक्स भाज्या) भाज्या घेण्यासाठी शहरातील सर्व मंडईत गर्दी झालेली आहे. अनेक शेतकरी मिक्स भाज्या विक्रीसाठी आले होते. अगदी दुपारपर्यंत सर्व मिक्स भाज्यांची विक्री विक्रमी पद्धतीने झाली, हे विशेष.

भाज्यांचे दर (प्रति पेंडीचे दर)

मिक्स भाजी किंवा शेकेची भाजी (४० रुपये पावकिलो), आळूची पाने (१० रुपयाला पेंडी), कोथिंबीर (१० रुपयाला चार पेंड्या), मेथी (१०), पालक-पोकळा-शेपू-कांदापात (१० रुपयाला पेंडी), पुदीना (५ रुपये पेंडी), कडीपत्ता (५ रुपये पेंडी).

फळ भाज्यांदे दर (प्रतिकिलो रुपये) :

लसूण (५०), कांदा (२० रुपयाला दिड किलो), बटाटा (१५/२०), कोल्हापूरी लहान बटाटा (१०), काटे भेंडी (८०), हिरवा वाटाणा (९०), पडवळ (१०/१५ रुपये एक नग), केळीचे फुल (१०/२० रुपये एक नग), केळीची पाने (५/१० रुपयाला एक पान), ताज्या भुईमूग शेंगा (८०), फरसबी (४०), घेवडा (२०/३०), ऊसावरील शेंग (३०), बिनीस (३०), हिरवी मिरची (३०), कोबी (१० रुपयाला दोन नग), फ्लॉवर (१० रुपयाला दोन नग), टोमॅटो (१०), भेंडी (२०), देशी गवार (५०), बंदरी गवारी (३०), ढब्बू मिरची (२०), हिरवे वांगे (१०), जांभळट रंगाचे वांगे (१०), दोडका (२०), हिरवी पापडी शेंग (५०), मुळा (१० रुपयाला दोन नग), हिरवी चवळी शेंग (३०), वालाची चवळी (२०), कारली (२०), देशी वाळूक (५०), आल्ले (४०/५०), शेवगा शेंग (१० रुपयाला तीन नग), लिंबू (दहा रुपयाला दहा नग), दूधी भोपळा (५/१० रुपये नग), मक्क्याचे कणीस (२० रुपयाला तीन ते चार नग), हिरवा टोमॅटो (५/१०), वरणा (२०), लाल बीट (५/१० रुपयाला दोन नग).

loading image
go to top