Kolhapur Crime News
esakal
Kolhapur Crime News : सासरवाडीहून घरी येताना वाटेत पत्नीचा खून; रस्त्यावरच हातोडा अन् कोयत्याने केले वार
पत्नीचा निर्घृण खून – पती प्रशांत पाटील (रा. भादोले) याने पेठवडगाव-कोरेगाव रस्त्यावर मोटारसायकल थांबवून पत्नी रोहिणी (२९) हिच्यावर कोयता व हातोड्याने हल्ला करून जागीच ठार मारले.
खुनानंतरची कबुली आणि पळ काढला – खून करून आरोपी घरी परतला व वडिलांना गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर घटनास्थळावर खात्री करून वडिलांनी पोलिसांना माहिती दिली. प्रशांत सध्या फरार आहे.
पोलिस तपास सुरू – घटनास्थळी हातोडा, कोयता आणि चटणीची पुडी मिळाली असून मोबाईल फॉरेन्सिक लॅबने पंचनामा केला. मृतदेह नवे पारगाव आरोग्य केंद्रात पाठवला आहे.
Kolhapur Shocking Incident : सासरहून पत्नीला घेऊन येताना पतीने वाटेत मोटारसायकल थांबवून तिचा निर्घृण खून केला. हा प्रकार सोमवारी रात्री आठच्या दरम्यान उघडकीस आला आहे. पेठवडगाव - कोरेगाव रस्त्यावर पतीने पत्नीवर कोयत्याने वार केले आणि डोक्यात हातोड्याने जोरदार मारहाण केली. या हल्ल्यात सौ. रोहिणी प्रशांत पाटील (वय २९) हिचा जागीच मृत्यू झाला आहे.